Sunday, July 14, 2024

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये झक्कास दिसतेय अजय देवगणची लेक; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांइतकीच त्यांच्या मुलांचीही सतत चर्चा सोशल मीडियावर होत असते. अनेक कलाकार आपल्या मुलांचे फोटो चाहत्यांशी शेअर करत असतात. याचप्रमाणे अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासाचीही सोशल मीडियावर सतत चर्चा होत असते. ती आपले फोटो शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

अभिनेता अजय देवगण आणि कजोल हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रपटांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याचीही नेहमी सोशल मीडियावर चर्चा होत असते. मात्र, यावेळी काजोल आणि अजय देवगण चर्चेचा विषय नसून चर्चा होतेय ती म्हणजे त्यांची मुलगी न्यासा देवगणची. न्यासाने एक ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमधील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. या नवीन फोटोमध्येही ती काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये आकाश न्याहाळताना दिसत आहे. या फोटोमध्ये १९ वर्षीय न्यासाचा बोल्ड लूक पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा परदेशात शिक्षण घेतेय. ती आपल्या ग्लॅमरस फोटोंमूळे आणि फॅशनमूळे नेहमी चर्चेत असते. तिची सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे इतकेच नाही, तर तिच्या नावाने इंस्टाग्रामवर अनेक पेजेस आहेत, ज्यावरून तिचे चाहते नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. या ब्लॅकड्रेसमधील लूकमुळे तिने पुन्हा एकदा सोशल मीडियाच तापमान वाढवले आहे. सध्या ती परदेशात शिक्षण घेत असून तिथून ती मित्रांसोबत फिरतानाचे, पार्टी करतानाचे फोटो शेअर करत असते.

हेही पाहा- अंडरवर्ल्ड डॉनच्या ‘त्या’ फोनने जास्मीनने रातोरात सोडला देश

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या न्यासाचा चाहतावर्ग पाहून तीसुद्धा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नसल्याचे दिसते. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे ती नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असते, तिचे फोटो पाहून तिला काळा रंग जास्त प्रिय आहे, असेच दिसते. कारण तिचे जास्त फोटो हे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्येच आहेत. न्यासाचे घायाळ करणारे सौंदर्य पाहता ती सुद्धा सिनेसृष्टीत करिअर करेल असे दिसत. मात्र, तिला यामध्ये रस नसल्याचे आधीच अभिनेता अजय देवगणने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा