‘वेदम’ फेम अभिनेते नगैया यांचा शनिवारी सकाळी 4:30 वाजता मृत्यू झाला आहे. वाढत्या वयात येणाऱ्या अनेक आजारांमुळे त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. नगैया हे 77 वर्षाचे होते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 30 पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप दाद मिळाली होती.
नगैया यांनी आपल्या करिअरमध्ये ‘वेदम’, ‘नगावली’, ‘ओकादिने’, ‘स्टूडेंट स्टार’, ‘सीमा ‘तापाकाई’, ‘नमनम’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. करिअरसोबतच त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप मेहनत करावी लागली. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे.
नगैया यांचा जन्म आंध्रप्रदेशमधील ‘गुंटूर’ जिल्ह्यामध्ये झाला होता. गावाकडे त्यांच्या नावावर दोन एकर जमीन होती. ते शेतातील काम सांभाळत होते. परंतु अनेक गोष्टींच्या अभावामुळे गावाकडे शेती करण्यास ते असमर्थ ठरले आणि ते त्यांच्या मुलासोबत हैद्राबादमध्ये गेले.
एके दिवशी नगैया यांची भेट राधाकृष्ण यांच्यासोबत झाली. त्यांनी नगैया यांना वेदम या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाव वेदम नगैया असे ठेवले. वेदम या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन, अनुष्का शेट्टी, मंचू मनोज हे मुख्य भूमिकेत होते.
नगैया यांना चित्रपटात काम करण्यासाठी तीन हजार पासून ते 25 हजारापर्यंत रक्कम मिळत असे. परंतु त्या वेळेस त्यांना जास्त काम मिळत नसे त्यामुळे त्यांची घर खर्च करण्यासाठी ओढाताण होत असे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांना आर्थिक परिस्थितीचा एवढा सामना करावा लागला की, खायला देखील पैसे नसल्याने त्यांनी रस्त्यावर भिक मागितली होती. ही गोष्ट जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कानावर पडली, तेव्हा त्यांनी नगैया यांना एक लाखाची मदत केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित










