Tuesday, May 28, 2024

सिद्धू मुसवालानंतर सलमानची हाेणार निर्घूण हत्या? गोल्डी बारने अभिनेत्याला दिली धमकी; म्हणाला, ‘तो आमच्या निशाण्यावर आहे…’

कॅनडामध्ये लपून बसलेल्या गोल्डी बार या गुंडाकडून सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला सतत धमक्या येत आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना गोल्डी बारने याबाबत खुलासा केला. काय म्हणाला गॅंगस्टर? चला, जाणून घेऊया…

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत, पंजाबी गायक सिद्धू मुसवाला (sidhu moose wala) याच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी बार म्हणाला की, “त्याची टोळी नक्कीच सलमान खानची हत्या करेल. इतकंच नाही, तर जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही त्याला मारून टाकू. मला भाई लॉरेन्स बिश्नोई यांनी सांगितले होते की, ‘त्यांनी अजून माफी मागितलेली नाही.’ बाबा तेव्हाच दया दाखवतात जेव्हा कोणी त्या माफीला पात्र असतो.” यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईनेही एका मुलाखतीत सलमान खानला मारणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय असल्याचे म्हटले होते.

गँगस्टर गोल्डी बारने असेही सांगितले की “सलमान खान त्याच्या हिटलिस्टमध्ये एकटाच नाही, तर जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही आमच्या प्रत्येक शत्रूला मारण्याचा प्रयत्न करत राहू. सलमान खान आमच्या टीमचे लक्ष्य आहे. आम्ही प्रयत्न करत राहू आणि यशस्वी केव्हा होईल हे सर्वांना कळेल.”

तपास यंत्रणा एनआयएने आपल्या आरोपपत्रात सांगितले आहे की, ‘लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सध्या 700 हून अधिक शूटर सक्रिय आहेत.’ आपल्या चार्जशीटमध्ये, एजन्सीने असेही निदर्शनास आणले आहे की, ही टोळी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे आणि इतर अनेक हायप्रोफाईल हत्यांमागील सूत्रधार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सलमानला बिश्नोईच्या टोळीकडून अनेक धमकीचे मेल आले होते, त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बार आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली हाेती.

लॉरेन्स बिश्नोई सध्या पोलिस कोठडीत आहे, तर गाेल्डी बार यांच्यावर कॅनडाच्या पोलिसांनी बक्षीस ठेवले आहे आणि इंटरपोलने त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.(bollywood salman khan will be killed he is on our target gangster goldy brar give open death threat after killing sidhu moose wala)

अधिक वाचा- 
अभिनेत्री कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘हे नात टिकवण्यासाठी ..’
Birthday | आरजेची नोकरी सोडून बनली यूट्यूबर, ‘असा’ मिळाला प्राजक्ता कोळीला बॉलिवूडमधील मोठा चित्रपट

हे देखील वाचा