Monday, July 8, 2024

KK Death | ‘कोलकातानेच केकेला मारले!’, गंभीर आरोप लावत नंदिता पुरींनी केली सीबीआय तपासाची मागणी

प्रसिद्ध गायक केके (KK) यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५३व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कुटुंब आणि मित्रपरिवारच नाही, तर लाखो चाहत्यांच्या डोळे ओलावले. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चाहत्यांना निराश केले नाही. केके यांचे ३१ मे रोजी निधन झाले. कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गायकाच्या मृत्यूनंतर कोलकाता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

त्याचवेळी या प्रकरणावर दिवंगत अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांची माजी पत्नी नंदिता पुरी (Nandita Puri) यांचे एक आश्चर्यकारक विधान समोर आले आहे. केकेच्या मृत्यूसाठी कोलकात्याला जबाबदार धरून, त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. (om puri ex wife nandita puri makes claim kolkata killed singer kk wants cbi investigation)

केके यांच्या निधनानंतर दिवंगत अभिनेते ओमपुरी यांची माजी पत्नी नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, कोलकातानेच केकेला मारले.

संताप व्यक्त करत नंदिता पुरी यांनी लिहिले, “पश्चिम बंगालची लाज वाटते. कोलकाताने केकेची हत्या केली आणि आता सरकार त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. मंचावर कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. अडीच हजार लोकांची क्षमता असलेल्या सभागृहात सात हजार लोक कसे आले? एसीही काम करत नव्हता. गायकाने चार वेळा तक्रार केली. औषधांची सोय नव्हती आणि प्राथमिक उपचारही नव्हते. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत बॉलिवूडने कोलकात्यातील कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा.”

नंदिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नंदिताची पोस्ट योग्य असल्याचे सांगत, केकेचे अनेक चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

केकेचा कोलकाता येथे २ दिवसांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. ३० मे रोजी परफॉर्म केल्यानंतर, ३१ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत केकेने नजरुल मंच येथे परफॉर्म केले. यादरम्यान केके यांची प्रकृती खालावली होती. केके यांनी छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची तक्रार केली होती. या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांना आराम वाटत नसल्याचे सहज दिसत आहे. केकेच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्याची बाबही समोर आली होती, त्यानंतर पोलिसांनी असामान्य मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा