Saturday, June 29, 2024

निमोनियाचे निदान झाल्याने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल; पत्नी रत्ना यांनी वृत्ताला दिला दुजोरा

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या चाहत्यांसाठी सिनेसृष्टीतून दुःखद आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, अभिनेते दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाले आहेत. अहवालात असे सूचित केले गेले आहे की, त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांच्या फुफ्फुसात एक पॅचही सापडला आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच या कठीण काळात नसीरुद्दीन यांचे कुटुंब त्यांच्यासोबत आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह यांनी न्यूज चॅनलने दिलेल्या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्या म्हणाल्या की, “नसीर साहेब यांना निमोनिया झाला आहे, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

रत्ना पाठक शाह यांनी पुढे सांगितले की, “त्यांच्या फुफ्फुसात न्यूमोनियाचा एक पॅच सापडला आहे, त्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. पण काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यांना कोव्हिड किंवा इतर कोणताही आजार नाहीये.”

महत्वाचे म्हणजे, तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या ७० वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना खार येथील त्याच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे दिलीपकुमार यांना श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे पुन्हा दाखल करण्यात आले आहे.

न्यूज चॅनलला अधिक माहिती सांगताना नसीरुद्दीन शाह यांचे सेक्रेटरी जयराज म्हणाले, “डॉक्टर नसीरुद्दीन शाहच्या तपासणी आणि उपचारात गुंतलेले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येऊ शकते. आरोग्यामधील सुधारणा लक्षात घेत, डॉक्टर त्यांना रुग्णालयातून सोडण्याबाबत निर्णय घेतील.” ही बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. तसेच चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा