Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

कलाकारांचा वाढदिवस म्हणजे फॅन्ससाठी कोणत्याही सणापेक्षा आणि पर्वणीपेक्षा कमी नसतो. कलाकार जेवढा मोठा तेवढा त्याचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा केला जातो. फॅन्स आपल्या आवडत्या कलाकाराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर जाऊन कलाकाराची एक झलक मिळवण्यासाठी प्रचंड आटापिटा करतात. याशिवाय त्यांना वेगवेगळे गिफ्ट देखील पाठवतात. अशातच जर बॉलिवूडच्या किंग खानचा वाढदिवस असेल तर विचारायलाच नको हो ना? शाहरुख खानचे संपूर्ण जगात कोट्यवधी फॅन्स आहेत. जे नेहमीच त्याच्या वाढदिवसाची त्याच्यापेक्षा अधिक आतुरतेने वाट बघत असतात.

शाहरुख २ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यापूर्वीच त्याच्या घरी ‘मन्नत’वर भेटवस्तू, पुष्पगुच्छ आदी अनेक गोष्टी यायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शाहरुखच्या बंगल्यासमोर एक गाडी उभी असून त्या गाडीत शाहरुखसाठी भरपूर भेटवस्तू आणि फुलांचे गुच्छ दिसत आहे. शाहरुखचे सुरक्षा रक्षक ते सर्व त्याच्या बंगल्यात नेत आहेत.

ऑक्टोबर महिना शाहरुखसाठी आणि त्याच्या संपूर्ण कटुंबासाठी खूपच कठीण होता. २ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला अं’मली पदर्थांच्या सेवनाच्या आरोपाखाली एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यन, शाहरुख खान सतत चर्चेत होते. आर्यनला जमीन मिळून त्याला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खान आणि त्याची संपूर्ण टीम आटोकाट प्रयत्न करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना २६ दिवसांनी यश आले २८ ऑक्टोबरला आर्यनला सशर्त जामीन मिळला आणि शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच आर्यन तुरुंगातून बाहेर आल्याने शाहरुख साठी हेच सर्वात मोठे वाढदिवसाचे गिफ्ट आहे. आर्यन बाहेर आल्यामुळे आता साजरा होणार शाहरुख खानचा वाढदिवस आणि दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. यासाठी शाहरुख खानच्या घराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा