Sunday, October 19, 2025
Home अन्य ‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ अभिनेता सोनू सुदने केली मोठी घोषणा

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ अभिनेता सोनू सुदने केली मोठी घोषणा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही काळापासून समाज सेवेत खूप सक्रिय आहे. आजकाल तो युद्धपातळीवर लोकांना मदत करण्यात गुंतलेला दिसतो. लॉकडाऊनच्या काळात सोनू बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव्ह दिसत होता. तो प्रत्येक क्षेत्रातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता त्याने 1 लाख जणांना रोजगार देऊन 10 कोटी देशवासियांचे जीवन बदलण्याचे वचन दिले आहे.

अभिनेता सोनू सूदने ही एक महत्वाकांक्षी योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. या योजनेत तो देशातील 1 लाख बेरोजगारांना रोजगार देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊ शकते. यासह, 1 लाख लोकांसह 10 कोटी लोकांचे जीवन बदलले जाईल.

सोनू सूदने ट्विटरवर लिहिले, “नवीन वर्ष, नवीन अपेक्षा. नवीन रोजगाराच्या संधी… आणि त्या संधींना तुमच्या जवळ घेऊन येत आहोत, नवीन आम्ही. प्रवासी रोजगार हा आता गुडवर्कर आहे. आजच गुडवर्कर अ‍ॅप डाउनलोड करा, आणि चांगल्या उद्याची आशा करा.” यासाठी त्याने अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे.

अभिनेत्याने पोस्टद्वारे सांगितले की, नवीन वर्षात नवीन अपेक्षा जागवल्या गेल्या आहेत. एक पोस्टर शेअर करत त्याने म्हटले की, “मी पुढील 5 वर्षात 10 कोटी लोकांचे जीवन बदलण्याची प्रतिज्ञा घेतो. 1 लाख लोकांना रोजगार देण्यात येणार आहे.” याशिवाय त्याने 1 लाख 20 हजार 52 लोकांना नोकर्‍या दिल्याची माहितीही दिली.

सोनू सूदने पोस्टरमधे असे लिहले आहे की, “प्रवासी कामगार आता गुडवर्कर आहेत.” सोनू सूद गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनपासून परप्रांत मजुरांच्या समस्यांबाबत खूप गंभीर आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न तो करत आहेत. आतापर्यंत अभिनेत्याने गरजू लोकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. आता त्याला स्थलांतरितांची बेरोजगारी हटवायची आहे. तर यासाठी तो त्याची नवीन योजना घेऊन आला आहे.

हे देखील वाचा