असे म्हणतात की, जगातील सर्वात प्रेमळ नाते हे भाऊ-बहिणीचे असते. कारण या नात्यात जितकी भांडणं असतात, तितकेच प्रेम आहे. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या भावा-बहिणींची (Silblings Day) बॉलिवूडमध्ये कमतरता नाही. या यादीत करीना कपूर – करिश्मा कपूर ते शिल्पा शेट्टी – शमिता शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे.
सारा अली खान – इब्राहिम खान
सारा अली खानच्या भावाचे नाव इब्राहिम खान आहे आणि तिचे इब्राहिमसोबतचे बॉन्डिंग अप्रतिम आहे. सिबलिंग डेच्या निमित्तानेही साराने इब्राहिमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूपच मजेदार आहे. त्याच वेळी, साराचे बाँडिंग केवळ भाऊ इब्राहिम खानसोबतच नाही, तर सावत्र भाऊ तैमूर आणि जेह यांच्याशीही आहे. (on world sibling day meet bollywood s brothers and sisters)
करीना कपूर – करिश्मा कपूर
करीना कपूर आणि करिश्मा कपूर म्हणजेच कपूर कुटुंबातील लोलो आणि बेबो. दोघेही एकमेकांना जीव लावतात. करिश्मा आणि करीना दोघींचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि एकमेकांची ताकद आहेत.
शाहिद कपूर – ईशान खट्टर
शाहिद आणि ईशान सावत्र भाऊ आहेत, पण त्यांचे बाँडिंग पाहून कोणीही हे ओळखू शकत नाही. ईशान शाहिदपेक्षा खूपच लहान आहे, त्यामुळे तो नेहमी आपल्या धाकट्या भावापाठीमागे खंबीरपणे उभा दिसतो.
शिल्पा शेट्टी – शमिता शेट्टी
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांच्यातील प्रेम त्यांना एकत्र पाहिल्यावर लगेचच दिसून. ‘बिग बॉस’च्या घरात राहत असताना शिल्पाला पाहून शमिता भावूक झाली आणि अनेक प्रसंगी तिने प्रेमही व्यक्त केले.
जान्हवी कपूर – अर्जुन कपूर
जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर देखील सावत्र भावंडं आहेत आणि एकेकाळी त्यांचे नाते कसे होते हे सर्वांनाच माहीत आहे. श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी ते एकमेकांशी बोलतही नव्हते. पण श्रीदेवींच्या जाण्याने त्यांच्या नात्याला नवे रूप मिळाले. आज अर्जुन जान्हवी आणि खुशीला त्याची सख्खी बहीण अंशुला इतकंच प्रेम करतो.