Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड पतौडी घराण्याची लाडकी सोहासोबत राहणे कुणालसाठी नव्हते सोप्पे, ‘यामुळे’ अनेकदा यायची अडचण

पतौडी घराण्याची लाडकी सोहासोबत राहणे कुणालसाठी नव्हते सोप्पे, ‘यामुळे’ अनेकदा यायची अडचण

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मात्र कालांतराने त्यांनी अभिनयापासून अंतर राखायला सुरुवात केली. यातच नाव येतं ते म्हणजे, सैफ अली खानची बहीण आणि पतौडी घराण्याची लाडकी लेक सोहा अली खानचं. सोहा अली खानने 4 ऑक्टोबर तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनय विश्वात प्रवेश केल्यानंतर तिने अनेक वर्षे चित्रपटांमध्ये काम केले, परंतु मुलीच्या जन्मानंतर तिने चित्रपट विश्वाला ‘अलविदा’ म्हटले. सोहाने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले आहे. पण सोहासोबत राहणे कुणालसाठी इतके सोपे नव्हते. अभिनेत्याने स्वतः एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. दोघे 25 जानेवारी 2015 रोजी विवाहबंधनात अडकले. कुणाल आणि सोहाने लग्नापूर्वी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे नाते वाटते तितके सोपे नव्हते. सोहा राजघराण्यातील आहे, तर कुणाल साध्या कुटुंबातील आहे आणि हे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वेळा दिसून आले. (once kunal kemmu told he used dictionary to talk with soha ali khan)

वापरावी लागायची डिक्शनरी
एकदा ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये, कुणाल केमू त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, सोहाशी बोलण्यासाठी त्याला डिक्शनरी वापरावी लागत असे. तो म्हणाला की, “सोहा परदेशात शिकली आहे आणि तिचे इंग्रजी खूप चांगले आहे. तर मी या देशात शिक्षण घेतले आहे, म्हणून माझे इंग्रजी देसी आहे. आमच्या भांडणादरम्यान सोहा असे काही शब्द बोलायची, ज्याचा अर्थ मला ऑनलाइन शोधावा लागायचा.” त्याने असेही सांगितले की, सोहामुळे त्याचा शब्दसंग्रह चांगला झाला आहे.

दोघांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले. तर कुणालने सोहाला पॅरिसमध्ये प्रपोज केले होते. दोघांचे लग्न रॉयल वेडिंग होते. कुणाल आणि सोहाची प्रेमकथाही खूप रंजक आहे. याविषयी बोलताना कुणाल आणि सोहा यांनी सांगितले होते की, जेव्हा दोघे पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघांनाही वाटले नव्हते की दोघांची मैत्री होईल. मात्र पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. मैत्री कधी प्रेमात बदलली, हे दोघांनाही कळले नाही. लग्न करण्यापूर्वी दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही काळ लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर कुणालने सोहाला एक दिवस पॅरिसमध्ये प्रपोज केले. सोहाने याबाबत सोशल मीडियावर पोस्टही केली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यांना इनाया नावाची गोड मुलगी देखील आहे.

हेही नक्की वाचा-
मोठी बातमी! आलिया भट्टला धक्का, पती रणबीरला ईडीने धाडलं बोलवणं, गंभीर प्रकरणात होणार चौकशी
कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली श्वेता तिवारी अनेक कठीण गोष्टींचा सामना करत झाली अनेकांची ‘प्रेरणा’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा