विकी कौशल अभिनित छावा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांतच शंभर कोटींचा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरला आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. ए आर रेहमान यांनी या चित्रपटात संगीत दिलं आहे. हा सिनेमा अगदी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांना फार आवडत आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नागपुरातील असून यात एक चाहता चक्क घोड्यावर बसून चित्रपट बघण्यासाठी थेटरच्या बाहेर आला आहे. या चाहत्याला बघून सर्वच जन चकित झाले आहेत.
नागपूरच्या पंचशील थेटर मध्ये हा चाहता चित्रपट बघण्यासाठी आला होता. यात या चाहत्याने अगदी हुबेहूब छत्रपती संभाजी महाराजांसारखी वेशभूषा केली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
इलियाना डिक्रूझ दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज, कोण आहे अभिनेत्रीचा पती?