Wednesday, July 3, 2024

‘आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस पुन्हा जगत आहे’, म्हणत अभिज्ञा भावेने पतीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. २०२१ मध्ये अभिज्ञा लग्न बंधनात अडकली आहे. त्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत ती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही माहिती देत असते. अशातच गुरुवारी (६ जानेवारी) रोजी तिचं लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्त तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या आठवणींना उजाळा झाला आहे.

अभिज्ञाने (Abhidnya Bhave) ६ जानेवारी २०२१ मध्ये तिचा बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत थाटामाटात लग्न केले. त्यांनी अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. अशातच लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात लग्नाच्या विधींचे काही फोटो आहेत, तसेच त्या दोघांचे काही रोमँटिक फोटो देखील आहे. (one year complete to abhidnya bhave’s wedding, actress share some moment of wedding)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस पुन्हा जगत आहे.
आमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अजून खूप काही ईश्वर तुम्हाला सदैव उत्तम आरोग्य देवो.सगळ्यासाठी धन्यवाद.”

तिने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते आणि अनेक कलाकार देखील कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. तिच्या या पोस्टवर श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, ऋतुजा बागवे, अमृता खानविलकर, रेश्मा शिंदे यांसाख्या अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. सगळेजण त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.

या मालिकेत ती अर्चनाच्या वहिनीचे म्हणजे मंजुषाचे पात्र साकारत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे. या शोमध्ये तिच्या विनोदी अंदाजाने तिने आख्खा महाराष्ट्राला हसवले आहे.

हेही वाचा :

‘बिग बॉस मराठी ३’ मधील ‘ही’ स्पर्धक करणार ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ मालिकेत एंट्री,

अनुष्का शर्मा ३ वर्षांनंतर क्रिकेटर बनून करणार कमबॅक, झुलन गोस्वामीच्या बायोपिकचा टीझर व्हिडिओ व्हायरल

शिवानी बावकरने धरला ‘मेरा यार’ स्टेप्सवर ठेका, स्टाईलिश लूकने घातली चाहत्यांना भुरळ 

 

 

हे देखील वाचा