Saturday, March 2, 2024

ऑरीसोबत फोटो काढण्यास काजोलचा नकार; दिपिकाच्या प्रतिक्रियेचाही केला KWK 8 मध्ये उल्लेख

जान्हवी कपूर, सुहाना खान,अनन्या पांडे , सारा अली खान आणि न्यासा देवगन यांच्यासह स्टार किड्स आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी अनेकदा पार्टी करताना आणि हँग आउट करताना दिसत असते.तो म्हणजे ऑरी. गेल्या वर्षी, जिवो वर्ल्ड प्लाझा लाँच करताना नीता अंबानी, दीपिका पदुकोण आणि इतर सेलिब्रिटींसोबतचे ऑरीचे फोटो व्हायरल झाले होते. तो सध्याला पापाराजीच्या फोटोंमधुन अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच ऑरीने बिग बॉस 17 मध्ये पाहुणा म्हणूनही हजेरी लावली होती आणि आता तो काॅफी विथ करण शोमध्येही(koffee with karan show) हजेरी लावताना दिसला आहे. यावेळी त्याने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.
काॅफी विथ करण शोच्या 8व्या सिझनचा (koffee with karan season 8) अंतिम एपिसोड 18 जानेवारीला टीवीवर पाहायला मिळणार आहे. कुश कपिल, तन्मय भट आणि स्टार किड्सचा खास मित्र ओराहन औत्रामनी उर्फ ऑरीदेखील या एपिसोडमध्ये दिसणार आहे. या एपिसोडमध्ये ऑरी(orhan awatramani) अनेक गोष्टींबद्दल खुलासा करताना दिसणार आहे. या शोमध्ये काजोल आणि दिपिका पदुकोणसोबत घडलेले किस्सेही त्याने सांगितले आहेत.

ऑरीसोबत फोटो काढण्यास काजोलचा नकार
त्याची पहिली नोकरी कोणती हे विचारल्यावर ऑरी(orry) म्हणाला, “माझी पहिली नोकरी, मी न्यूयॉर्कमधील कॉलेजमध्ये असताना, स्थाननिर्देशक पदासाठी होती,चिल्ड्रनस शूड वाॅश देअर हँडस… या परिषदेत ते अत्यंत मागणी असलेले स्थान होते. लोकांना हे कदाचित माहित नसेल; मी काजोलचा 3 नंबरचा स्थाननिर्देशक होतो, आणि कदाचित तिलाही हे माहित नसेल. मला वाटते, हे 2013 मध्ये न्यूयॉर्कमध्ये, द पियरे या हाॅटेलमध्ये होते. काजोल(kajol) भाषण देत होती आणि मी तिच्या सिक्युरिटीला एका फोटोसाठी विचारलं आणि त्यांनी मला नकार दिला होता”
तेव्हा करण म्हणाला, “खूपच मोठी विडंबन! कारण तिला तेव्हा माहीत नव्हतं की काहीवर्षांनंतर तू तिच्या मुलीसोबत (nysa devgan) लाखो फोटोंमध्ये असशील.” ऑरी पुढे म्हणाला, “हो, आयुष्य हे वर्तुळासारखं आहे… मला न्यासा आवडते. ती माझ्या धाकट्या बहीणीसारखी आहे.”

ऑरीला वाटते दिपिकाची भीती
दीपिका पदुकोण(deepika padukone) आणि पती अभिनेता-रणवीर सिंग(ranveer singh) यांचा समावेश असलेल्या KWK 8 च्या सुरुवातीच्या भागाविषयी बोलताना, ऑरी करणला(karan johar) म्हणाला, ” तो छान भाग होता! त्यामुळे कधी कधी मला या सीझनमध्ये फसवणूक झाल्याचे जाणवते…पुढे तो करणला उद्देशून म्हणाला, “तू सर्व कलाकारांना खऱ्या माणसांमध्ये बदललेस. जेव्हा मी रणवीर आणि दीपिकाला बोलताना पाहत होतो, मला दीपिका पदुकोणशी रिलेट झालं.” मला दीपिका पदुकोणशी कधीच रिलेट करायचं नव्हतं! ” तो पुढे दिपिकाला उद्देशून म्हणाला,”डीपी प्लीज,डोंट रिलेट टु मी. माझे तुझ्यावर प्रेम आहे.”
त्याने पुढे हेही कबुल केले की,तो दिपिकाला खुप घाबरतो. तो म्हणाला, ” मला आठवतंय की एकदा आम्ही दोघांनी केसांचा सारखा बन घातला होता आणि मी तिला म्हणालो. ‘डीपी, आपण सेम हेअरस्टाइल केली आहे.आणि तिने माझ्याकडे असं पाहिलं जसं तिला माहितीच नाही मी कोण आहे. आणि तु तसं केलंस त्यामुळे, आय लव्ह यु.”

या एपिसोडमध्ये अजुन खुप खुलासे पाहायला मिळणार आहेत. यासाठी प्रेक्षक 18 जानेवारीच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत.हा एपिसोड काॅफी विथ करण शोच्या 8 व्या सिझनमधील शेवटचा एपिसोड असणार आहे.

हे देखील वाचा