Sunday, August 3, 2025
Home कॅलेंडर हॉलिवूडवर शोककळा! ‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेत्याचं निधन

हॉलिवूडवर शोककळा! ‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेत्याचं निधन

हॉलिवूडची सुप्रसिद्ध फ्रेंचाइजी ‘मार्व्हल्स’च्या बहुतांश चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेता व्हिल्यम हर्टने (William Hurt) रविवारी (१३ मार्च) रोजी या जगाचा निरोप घेतला. ते ७१ वर्षांचे होते. व्हिल्यम हे हॉलिवूडमधील महान अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम केले आहे.

‘कॅप्टन अमेरिका’, ‘ब्लॅक विडो’, ‘द इनक्रेडिबल हल्क’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेता व्हिल्यम हर्टचा कर्करोगाशी लढा देताना मृत्यू झाला. विल्यम यांनी स्वतः २०१८ मध्ये सांगितले होते की, ते या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. ते टर्मिनल प्रोस्टेट या कर्करोगाने ग्रस्त होते, जो त्यांच्या हाडांमध्ये पसरला होता. ते बराच काळ लढत होते आणि खूप प्रयत्न करून अखेर जीवनाची लढाई हरले. (oscar winning actor william hurt died fighting cancer at the age of 71)

मुलाने व्यक्त केले दुःख
त्यांचा मुलगा विल त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल बोलताना म्हणाला, “माझे प्रिय वडील, ऑस्कर विजेते विल्यम हर्ट यांच्या निधनाने आमचे संपूर्ण कुटुंब दु:खी झाले आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबासमोर अत्यंत शांततेत शेवटचा श्वास घेतला. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.”

तीन वेळा जिंकला ऑस्कर पुरस्कार
हर्टने न्यूयॉर्क शहरातील ज्युलिअर्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते आणि त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ‘किस ऑफ स्पायडर वुमन’, ‘चिल्ड्रन ऑफ अ लेसर गॉड’ आणि ‘ब्रॉडकास्ट न्यूज’साठी त्यांना ऑस्करसाठी नामांकनही मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा