Thursday, June 19, 2025
Home कॅलेंडर ऑस्कर विजेते जॉन झॅरिटस्काय यांचे निधन, वयाच्या ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्कर विजेते जॉन झॅरिटस्काय यांचे निधन, वयाच्या ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्कर पुरस्कार विजेते जॉन झॅरिटस्काय (John Zaritsky) यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. झॅरिटस्काय यांनी कॅनडातील व्हँकुव्हर जनरल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

जॉन झॅरिटस्काय यांना १९८३ मध्ये ‘जस्ट अदर मिसिंग किड’ या माहितीपटासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा चित्रपट एका कॅनेडियन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आधारित होता, जो युनायटेड स्टेट्सला भेट देत असताना गायब होतो. या माहितीपटात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी, त्यांच्या पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण करण्यात आले आहे. (oscar winning filmmaker john zaritsky passed away at the age of 79)

४०हून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत जॉन यांचे चित्रपट
त्यांच्या ४०वर्षांच्या कारकिर्दीत, चित्रपट निर्माता जॉन झारित्स्की यांनी थॅलिडोमाइडवर ट्रायॉलॉजी डॉक्युमेंट्रीवर काम केले. त्यांनी युद्ध, आत्महत्या, गुन्हेगारी आणि इतर अनेक गुंतागुंतीच्या कथा कव्हर केल्या. जॉन झॅरिटस्काय यांचे कार्य ३५ देशांमध्ये प्रसारित केले गेले आहे आणि त्यांचे चित्रपट सनडान्स आणि टोरंटोसह जगभरातील ४०हून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत.

‘या’ पुरस्कारांनी केलं गेलंय सन्मानित
जॉन यांना १९८७ मध्ये ‘रेपिस्ट्स: कॅन दे बी स्टॉप्ड’साठी केबल एस अवॉर्ड, ‘माय हसबंड इज गोइंग टू किल मी’साठी गोल्डन गॅवेल अवॉर्ड, ‘बॉर्न इन आफ्रिका’साठी रॉबर्ट एफ केनेडी फाऊंडेशन अवॉर्डने पुरस्कृत केले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा