Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड ओशो यांनी विनोद खन्नांमार्फत महेश भट्ट यांना ‘या’ कारणासाठी दिली होती आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी

ओशो यांनी विनोद खन्नांमार्फत महेश भट्ट यांना ‘या’ कारणासाठी दिली होती आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी

बॉलिवूड कलाकारांचा देखील अध्यात्मावर विश्वास आहे. अनेकदा बरेच कलाकार त्यांची श्रद्धा असलेल्या ठिकाणी जातात आणि त्यांची शिकवण अंगिकारतात. बॉलिवूडमध्ये एक असा काळ आलं होता जेव्हा ओशो रजनीश यांच्यावर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची मोठी श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी ओशो यांना फॉलो करायला सुरुवात केली. यात दिग्दर्शक महेश भट्ट यांचा देखील समावेश होता. अरबाज खानच्या द इनविंसिबल या शोमध्ये आलेल्या महेश भट्ट यांनी अनेक खुलासे केले आहेत. यात त्यांनी ओशोंबद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

महेश भट्ट यावेळी म्हणाले, “मी एक सामान्य व्यक्ती होतो. मी तयार केलेले ‘विश्वासघात’ आणि ‘मंजीले और भी है’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यानंतर मी अध्यात्माकडे ओढला गेलो. त्यावेळी मी पुण्याचे प्रसिद्ध गुरु रजनीश ओशो यांच्याकडे गेलो आणि मी तिथे त्यांच्या आश्रमात राहू लागलो. मी तिथे संन्याशी वस्त्र घालत मेडीटेशन करायचो. मी त्यांच्याकडे स्वतःला समर्पित केले होते. विनोद खन्ना यांना मीच ओशो यांच्याकडे घेऊन गेलो. पुढे विनोद खन्नाने त्यांचे शिष्यत्व घेतले मी मात्र ओशोपासून वेगळा झालो.”

पुढे महेश भट्ट यांना मोठा खुलासा करत ओशो यांनी विनोद खन्ना यांच्यामार्फत त्यांना धमकवल्याचे देखील सांगितले ते म्हणाले, “ओशो यांनी मला दिलेली माळ मी कमोडमध्ये फेकून दिली. नंतर विनोद खन्ना मला ते म्हणाले की मी ओशो यांनी दिलेली माळ कमोडमध्ये फेकल्याने भगवान खूप नाराज झाले आहेत. मी तेव्हा विनोद यांना म्हणालो की हा एक खोटेपणा आहे, मी मूर्ख होतो. त्यावेळी भगवान यांनी मला येऊन ती माळ पुन्हा परत दे असा निरोप विनोद खन्नातर्फे पाठवला आणि जर मी तसे केले नाही तर ते माझे आयुष्य उद्ध्वस्त करतील अशी धमकी त्यांनी विनोद खन्ना यांना मला दयायला लावली.” पुढे महेश भट्ट यांनी ओशो यांचा नाद सोडला. मात्र ओशो यांनी विनोद खन्ना आणि त्यांच्यामध्ये फूट निर्माण करण्याचे देखील काम केले. ही वेगळी गोष्ट आहे की, दोघीही त्यांचे नाते त्यांची मैत्री कायम जपली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा