Wednesday, January 14, 2026
Home अन्य पाकिस्तानी अख्तरने केले भारतासाठी मदतीचे आवाहन, स्वरा भास्करने यावर दिली अशी प्रतिक्रीया

पाकिस्तानी अख्तरने केले भारतासाठी मदतीचे आवाहन, स्वरा भास्करने यावर दिली अशी प्रतिक्रीया

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात भयाणक वातावरण झाले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अश्यातच प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही नागरिक ऐकत नसल्याने आता लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली आहे. अनेक कलाकार देखील व्हिडिओमधून नागरिकांना घरी राहण्याचे संदेश देत आहे. आता कलाकार सोबत खेळाडू देखील नियमांचे पालन करा असे सांगत आहे, तर काहीजण कोरोना रुग्णांना मदत देखील करत आहे.

भारतातील ही भयाणक परिस्थिती बघता, पाकिस्तानचा पूर्व गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या चाहत्यांना भारताला मदत करा अशी विनंती केली आहे. शोएबने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांना विनंती केली आहे की, “आपण भारताला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे.” हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, “भारत कोरोनाशी लढत आहे. त्यांना जागतिक मदतीची गरज आहे.”

शोएबने पुढे लिहिले की, ” ही एक महामारी आहे. या काळात आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. आपल्याला त्यांना मदत करायला पाहिजे.” त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच अभिनेत्री स्वराने कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. स्वराने लिहिले आहे की, “धन्यवाद शोएब अख्तर. तुमच्या या शब्दांसाठी आणि एक माणुसकी दाखवल्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.”

स्वराच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वी तिची सीरिज ‘भाग बिनी भाग’ नेटफलिक्सवर रिलीझ झाली होती. या सीरिजला तिला खूप प्रेम मिळाले होते. यामधे तिला एक विनोदी कलाकार बनायचे होते. परंतु यामध्ये तिच्या आयुष्यात जे काही होते ते खूप मजेशीर आहे.

स्वरा लवकरच ‘जहां चार यार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत शिखा, मेहर वीज, पूजा चोप्रा दिसणार आहे. तिच्या या चित्रपटात चार मैत्रिणी असणार आहे. ज्या सामान्य परिवारातून आलेल्या असणार आहेत. ज्यांचे पती त्यांच्या पासून लांब राहतात. तेव्हा त्यांचेकडे करायला काहीच नसते.यांनतर त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो आणि तिथून पुढे या स्टोरीला सुरुवात होते.

हे देखील वाचा