Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड कलाकार आहेत भारतीय, पण त्यांच्या घरांची संग्रहायलय होणार पाकिस्तानात, कसं ते वाचा

कलाकार आहेत भारतीय, पण त्यांच्या घरांची संग्रहायलय होणार पाकिस्तानात, कसं ते वाचा

बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार म्हणजे शोमॅन राज कपूर आणि ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांनी हिंदीसिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि हिट सिनेमे दिले. अभिनयाचे विद्यापीठ म्हणूनच या दोघांकडे पाहिले जाते. आपल्या अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे हे कलाकार जरी भारतीय असले तरी त्यांचे खानदानी घर पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान सरकारने या दोन्ही लगेन्ड्सच्या घरांचे रूपांतर एका संग्रहालयात करायचे ठरवले आहे.

आज जरी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश असले तरी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हे दोन देश अस्तित्वातच नव्हते. भारत हा अखंड देश होता. मात्र भारताची फाळणी झाली आणि भारत, पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. दिलीप कुमार आणि राज कपूर यांचे आताचे पाकिस्तानमधील घर हे फाळणी आधी असलेल्या अखंड भारताचा एक भाग होता. मात्र फाळणी झाल्याने या दोन्ही कलाकारांचे घर पाकिस्तानात गेले.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात असलेल्या यांच्या घरांचे संग्रहालयात रूपांतर केले जाण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. या दोन्ही कलाकारांचे खानदानी घर हे राष्ट्रीय संपत्ती घोषित करत हे घरं दुरुस्त करण्यासाठी सरकारने २.३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली.

पेशावरचे डेप्युटी कमिशनर मुहम्मद अली असगर यांनी काही रिपोर्टच्या अनुसार दिलीप कुमार यांच्या घराची किंमत ८०.५६ हजार रुपये तर राज कपूर यांच्या घराची किंमत १.५० कोटी रुपये इतकी ठरवली आहे. राज कपूर यांच्या तिथल्या हवेलीला ‘कपूर हवेली’ म्हणून ओळखले जाते. ही हवेली किस्सा ख्वानी बाजार परिसरात आहे. ही हवेली राज कापू यांचे आजोबा दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ ते १९२२ या काळात बांधली होती.

या घरांच्या मालकाने बऱ्याच आधी कमर्शियल बिल्डिंगसाठी या दोन्ही घरांची तोडफोड केली आहे. मात्र पाकिस्तान सरकारने या घरांचे ऐतिहासिक महत्व ओळखत सरकारच्या पुरातत्व विभागाने या कामावर निर्बंध आणले. एक विशेष गोष्ट म्हणजे या दोन्ही कलाकारांच्या घरापासून जवळच शाहरुख खानचे देखील खानदानी घर आहे. शाहरुखच्या वडिलांनी फाळणीनंतर भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता.

हे देखील वाचा