Monday, July 1, 2024

‘मी भारतीय नागरिक आहे, माझ्याकडे…’, अभिनेत्री अर्शी खानचे ‘पाकिस्तानी’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्यावर प्रत्येकालाच प्रसिद्ध व्हायचं असतं. कलाकार देखील आपल्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. ‘बिग बॉस’ फेम अर्शी खान देखील आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असते. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे काही मुस्लिम कलाकारांना ट्रोल केलं जात आहे. अर्शीला देखील अशा ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे.

या अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरामध्ये दोन वेळा हजेरी लावली होती. त्यामुळे बिग बॉसमुळे ती चांगलीच चर्चेत होती. त्यादरम्यान तिने आपला जन्म अफगाणिस्तानमध्ये झाल्याचं सांगितलं होतं. तिचे आई- वडील हे अफगाणिस्तानातून भारतात आले व इकडेच स्थायिक झाले. जेव्हापासून तिने याचा खुलासा केला, तेव्हापासून तिला ट्रोलचा सामना करावा लागला. तिने आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Pakistani actress arshi Khan said roots are Afghan and I am only hindustani)

अर्शी म्हणाली की, “अनेक लोकांना असं वाटतं की, मी पाकिस्तानी आहे. मी पाकिस्तानी असून देखील भारतात येऊन राहते. अनेकांनी मला यावरून खूप वेळा ट्रोल केलं आहे. त्या सर्वांना मी हे स्पष्ट सांगू इच्छिते की, मी एक भारतीय नागरिक आहे. माझ्याकडे भारतातील सर्व कागदपत्रे आहेत. तरी देखील काही लोक मला पाकिस्तानी बोलतात. मला या गोष्टीचे फार वाईट वाटते. मी सर्वांना हे स्पष्ट सांगू इच्छिते की, मी एक भारतीय आहे.” तिचे असे म्हणणे आहे की, ती युसुफ जाहीर ग्रूपची अफगाणी पठाण आहे.

तिच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने ‘मल्ली मिष्ठू’ या तमिळ चित्रपटातून २०१४ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच बिग बॉस ११ व १४ मध्येही तिने सहभाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा