Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मला भीती वाटल्यामुळे भारतीय…’, शाहरुख खानसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा धक्कादायक खुलासा

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा बॉलिवूडवर उमटवला आहे. अभिनेत्री माहिरा खान आपल्या देशातही तितकीच प्रसिद्ध आहे. माहिरा तिच्या सौंदर्य, आणि अभिनयासाठी ओळखली जाते. माहिरा खानने २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘रईस’ या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. प्रत्येकालाच वाटले होते की, तो दिवस दूर नाही, जेव्हा माहिरा बॉलिवूड स्टार बनेल. पण त्यानंतर बॉलिवूडने, पाकिस्तानी कलाकारांवर काम करण्यास बंदी घातली होती.

भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यानंतर, माहिराला पाकिस्तानला परत यावं लागले होते. आता माहिराने भारतात काम मिळवण्याबाबत, आपला मुद्दा मांडला आहे. तिने सांगितले आहे की, ‘रईस’ नंतर तिला बर्‍याच वेब सीरिजची ऑफर देण्यात आली होती, पण तिने त्यात काम करण्यास नकार दिला होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, माहिरा सांगते की, “एकत्र काम केले, तर संपूर्ण भारतीय उपखंडात कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, हे निश्चित आहे.’ यासह तिने असे म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा भारतीय चित्रपट, आणि वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.”

माहिराने तिला भीती वाटल्यामुळे भारतीय वेब सीरिजच्या ऑफर स्वीकारल्या नसल्याचेही सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, “मला भारतात बर्‍याच वेब सीरिजची ऑफर देण्यात आली होती, परंतु मी त्या स्वीकारल्या  नाहीत. कारण त्यावेळी मला भीती वाटली होती. लोक काय बोलतात याने काही फरक पडत नाही, परंतु मला भारतातही जायचे होते की नाही हेदेखील माहित नाही. मला जे देऊ केले ते चांगले काम होते.”

“मला भीती वाटली, आणि हे स्वीकारण्यात मला लाज वाटत नाही. मला आशा आहे की, आम्ही लवकरच एफआयएस बरोबर एकत्र काम करू, आणि चाहत्यांसमोर काहीतरी चांगले सादर करू,” असेही तिने सांगितले.

भारतीय सैन्यावर २०१६ मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानशी सर्व संबंध संपवण्याची चर्चा होती. त्यानंतर भारत सरकारने, आणि बॉलिवूडने पाकिस्तानी कलाकार, आणि गायकांवर पूर्णपणे बंदी घातली होती. त्याचवेळी रईस रिलीज झाला होता, परंतु माहिरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आली नव्हती. माहिराप्रमाणेच अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा