×

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आईचे झाले अपहरण; संपत्तीच्या वादामुळे पंतप्रधानांकडे मागितली मदत

पाकिस्तानमध्ये नेहमीच काहीना काही अघटित घडतच असते. पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या विनोदी व्हिडिओमुळे, भारतातही लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मीराला मागच्या काही काळापासून सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार मीराला आणि तिच्या परिवाराला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे.

नुकताच तिच्या घरावर मोठा हल्ला झाला असून यात तिच्या आईचे अपहरण करण्यात आले आहे. मीराच्या लाहोर येथील घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. मीराने सांगितले की, “मागील काही दिवसांपासून काही लोकं माझ्या प्रॉपर्टीच्या मागे लागले असून, त्यासाठीच माझ्या घरावर हा हल्ला झाला आणि माझ्या आईचे अपहरण झाले आहे.”

View this post on Instagram

A post shared by Meera 💕Official page (@meerajeeofficial)

पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या ‘डेली जंग’च्या एका बातमीनुसार मीराने पाकिस्तान सरकारकडे मदतीसाठी याचना केली आहे. मीराने सरकारकडे मागणी करत सांगितले की, “माझ्या संपूर्ण परिवारासाठी सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.” सोबतच तिने पोलिसांकडे तक्रार करत म्हटले आहे की, “माझ्या घरावर हल्ला तर झाला आहेच, सोबत माझ्या कुटुंबाला धमक्या देऊन त्रास देण्यात येत आहे.” (pakistani actress meera mother kidnapped pleaded for help from pakistan pm)

मीराने एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझी जमीन बळकावू पाहणारी व्यक्ती मियां शाहिद मला धमकी देत आहेत. शिवाय तो भाडेकरू म्हणून राहत असून बेकायदेशीरपणे माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. याच माणसाने माझ्या आईचे अपहरण केले असून, आता माझ्या कुटुंबाची संपत्ती घेण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मी लाहोरच्या सीसीपीओमध्ये तक्रार करून पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे मदतीची मागणी केली आहे. मी माझे संपूर्ण करियर या देशाला दिले आहे. आज यासाठीच मी या देशाच्या सरकारकडे, पंतप्रधानांकडे मदत मागत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Meera 💕Official page (@meerajeeofficial)

मीराने ज्या मियां शाहिद महमूदवर संपत्ती हडपण्याचा आणि आईचे अपहरण करण्याचा आरोप लावला आहे, त्याने सांगितले की, “मी मीराच्या आईकडून सदर प्रॉपर्टी विकत घेतली असून, त्याचे पूर्ण पैसे देखील दिले आहे. मात्र जेव्हा मी त्या प्रॉपर्टीचे पेपर मागितले, तेव्हा मला ते द्यायला टाळाटाळ करण्यात आली.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित

Latest Post