Monday, July 1, 2024

अरेरे! होणाऱ्या नवऱ्याने उडवली पाकिस्तानची खिल्ली; अभिनेत्रीने थेट मोडला साखरपुडा

पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासिरने तिचा होणार पती क्रिस्टियन बेट्जमॅनसोबत लग्न मोडले आहे. क्रिस्टियनने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या सुरू असलेल्या वादात पाकिस्तानची थट्टा केली. याच कारणामुळे झोयाने त्याच्याशी साखरपुडा मोडला आहे.

झोयाचे असे म्हणणे होते की, त्याने ट्वीट करून इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादावरून पाकिस्तानची खिल्ली उडवत त्यांना ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ हा करार दिला होता. हीच गोष्ट तिला खूप खटकली आणि तिने क्रिस्टियनसोबत सगळे संबंध तोडून टाकले.

क्रिस्टियन एक जर्मन ब्लॉगर आहे. या दिवसात त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, यावेळी प्रार्थना करून काहीही उपयोग होणार नाही. क्रिस्टियनने पॅलेस्टाईनचे समर्थन करताना आवाज उठवणाऱ्या पाकिस्तानी लोकांवर प्रश्न उठवले आहे. त्याने सांगितले की, “दुसऱ्यांचा वाईट विचार करणे आता सोडून द्या. तुम्ही लोक आता तुमच्या देशाला बर्बाद करत आहात. जे तुम्ही तुमच्या लोकांसाठी काही चांगले करू शकत नाही, तर इतरांचे काय चांगले करणार.”

या घटनेनंतर झोयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “मी आणि क्रिस्टियन आता लग्न करणार नाहीत. क्रिस्टियनने माझा देश, माझी संस्कृती आणि लोकांबाबत अचानक मत बदलले आहे. त्याने माझ्या धर्माबद्दल जी असंवेदशीलता दाखवली आहे. त्यामुळे त्याने मला हा कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.”

झोयाने पुढे सांगितले की, “देशाच्या काही धार्मिक आणि सामाजिक सीमा असतात त्यांना आपण पार नाही करू शकत. त्यामुळे मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नम्रता, सहिष्णुता आणि सन्मान या अशा गुणांचे आपल्याला नेहमी पालन करता आले पाहिजे.” यानंतर तिने लिहिले की, “मी अल्लाहकडे प्रार्थना करते की, सध्या चाललेल्या सामाजिक परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती तो मला देईल.”

या पोस्टनंतर मात्र झोया चांगलीच चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा