Tuesday, July 9, 2024

दु:खद! प्रसिद्ध पाकिस्तानी कॉमेडियन उमर शरीफ यांचे निधन; कपिल शर्माही हळहळला

मागील अनेक दिवसापासून मनोरंजन क्षेत्रातून अनेक दुःखद घटना समोर येत आहेत. अशातच पाकिस्तानमधील प्रसिद्ध कॉमेडियन उमर शरीफ यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. उमर शरीफ यांचे शनिवारी (२ ऑक्टोबर) वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांची बायपास सर्जरी झाली, त्यानंतर त्यांची तब्येत खूप बिघडली.

उमर शरीफ यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील तसेच टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार दुःख व्यक्त करत आहेत. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच कॉमेडियन कपिल शर्मा याने उमर शरीफ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते देखील त्यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त करत आहेत. (pakistani comedian umer sharif passed away)

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने ट्वीट करत लिहिले की, “अलविदा लिजंड, तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”

उमर शरीफ यांची प्रकृती आधीपासूनच खराब असल्याने २८ सप्टेंबर रोजी त्यांना उपचारासाठी अमेरिकेला नेण्यात आले होते. परंतु प्रवासात त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि त्यांना जर्मनीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उमर शरीफ यांचा जन्म १९ एप्रिल, १९५५ रोजी कराचीच्या लियाकताबाद येथे एका उर्दू भाषिक कुटुंबात झाला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या हास्य कलाकारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होतो.

वयाच्या १४ व्या वर्षी स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे हे अभिनेने ६० हून अधिक स्टेज कॉमेडीज आणि विविध टेलिव्हिजन शोमध्ये दिसले आहेत. तसेच दोन चित्रपटांमध्ये त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

हे देखील वाचा