Friday, July 5, 2024

पाकिस्तानात ट्रकवर का चिकटवले जातायेत सिद्धू मुसेवालाचे फोटो? कारण जाणून पाणावतील डोळे

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा सिद्धूच्या चाहत्यांना त्याची आठवण येत नसेल. या प्रसिद्ध गायकाचे चाहते देशातच नाही, तर परदेशातही आहेत. अलीकडेच, त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला एका खास पद्धतीने आदरांजली वाहिली आहे, जे पाहून सर्वांचे डोळे पाणावले आहेत.

अनोख्या पद्धतीने दिली आदरांजली
खरं तर, ११ जून रोजी सिद्धू मुसेवालाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने देशासह विदेशातही चाहत्यांनी त्याची आठवण काढली. टाइम्स स्क्वेअरने सिद्धू मुसेवालाच्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात आठवण काढली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पाकिस्तानातील ट्रकचालकांनीही सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली आहे. ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील. (pakistani fans gave special tribute to singer sidhu moosewala)

सिद्धू मुसेवालाने या जगाचा निरोप घेतल्यापासून, त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या जाण्यानंतर चाहते आपापल्या परीने त्याची आठवण काढत आहेत. आपला शेजारी देश पाकिस्तानमध्येही असेच काही चाहते आहेत, ज्यांनी सिद्धू मुसेवालाची खास पद्धतीने आठवण काढली. कुणी ट्रकवर त्याचे पोस्टर लावले, तर कुणी दुचाकीवर लावले.

भावूक झाले चाहते
ट्रकच्या पोस्टरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या ट्रकच्या मागे सिद्धू मूसवालाचे पोस्टर लावत आहे. यानंतर तो त्याला साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच खूप लोकप्रिय झाला आहे. हे बघून चाहते भावूक होत आहेत.

दरम्यान २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा