Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड पाकिस्तानी रेस्टॉरंटचे लाजिरवाणे कृत्य! पुरुषांना भुरळ घालायला वापरला ‘गंगूबाई काठियावाडी’चा हा सीन

पाकिस्तानी रेस्टॉरंटचे लाजिरवाणे कृत्य! पुरुषांना भुरळ घालायला वापरला ‘गंगूबाई काठियावाडी’चा हा सीन

भारत-पाकिस्तानातील संबंध कोणाला माहीत नाहीत? पाकिस्तानकडून सीमेवर अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते, जे आता सर्रास होत असते. मात्र यावेळी पाकिस्तानने असे कृत्य केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा आपल्या देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आरोप होत आहे. खरं तर, नुकतेच पाकिस्तानमधील एका रेस्टॉरंटचे अत्यंत लाजिरवाणे कृत्य समोर आले असून, त्यानंतर ते रेस्टॉरंट वादात सापडले आहे.

कराचीस्थित या रेस्टॉरंटने ‘गंगूबाई काठियावाडी’ या बॉलिवूड चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या भूमिकेनुसार ऍक्शन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून जोरदार वाद सुरू आहे. (pakistani restaurant used alia bhatt scene from gangubai kathiawadi for promotions)

आलियाच्या सीनचा गैरवापर
पाकिस्तानमधील एका रेस्टॉरंटने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या हिट चित्रपटातील एक सीन लोकांना ऑफर करण्यासाठी वापरला आहे. ही क्लिप शेअर करण्यामागील रेस्टॉरंटचा हेतू पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे. इतकेच नाही, तर रेस्टॉरंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पुरुष ग्राहकांसाठी २५ टक्के सूटही जाहीर केली आहे.

खरं तर आलियाने या चित्रपटात वेश्येची भूमिका साकारली होती. पुढे ती आपल्या समाजातील महिलांसाठी मसिहा बनते. यातील सीनचा वापर चित्रपटातील पुरुषांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आला आहे, जो कराचीतील या रेस्टॉरंटने प्रसिद्धीसाठी वापरला आहे.

‘इतकी’ सूट देण्याचे दिले आश्वासन
कराचीतील स्विंग रेस्टॉरंटने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर आलिया भट्टचे हे पोस्टर शेअर करून, पुरुषांना ऑफर दिली आहे. यासोबतच त्यांनी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरून कॅप्शनमध्ये लिहिले, “आजा ना राजा, कोणाची प्रतीक्षा आहे?” रेस्टॉरंटने केलेल्या या कृत्यानंतर त्यावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडिया युजर्स याला अत्यंत वाईट कृत्य म्हणत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा