Monday, June 23, 2025
Home अन्य पाकिस्तानी मालिकेत ‘वैवाहिक बलात्काराचा’ सीन? लेखिकेच्या ‘त्या’ बोल्ड वक्त्यव्यावर चाहते नाराज

पाकिस्तानी मालिकेत ‘वैवाहिक बलात्काराचा’ सीन? लेखिकेच्या ‘त्या’ बोल्ड वक्त्यव्यावर चाहते नाराज

सध्या भारतात पाकिस्तानी मालिकांची क्रेझ सातत्याने वाढत आहे. भारतातील लोक आता एकता कपूरच्या मालिकांपेक्षा पाकिस्तानी मालिकांना अधिक पसंती दर्शवत आहेत. आता अलीकडेच एक पाकिस्तानी मालिका ‘तेरे बिन’ यूट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टचा एक भाग बनली आहे. या शोला भारतात देखील भरभरून प्रेम मिळत आहे, मात्र दुसरीकडे या शोबाबत सोशल मीडियावर नवीन वाद उफाळून आल्याच पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे या पाकिस्तानी मालिकेमध्ये ‘वैवाहिक बलात्कार’चा एक सीन दाखवण्यात आला, जो पाहिल्यानंतर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. प्रेक्षक कलाकारांसह शोच्या दिग्दर्शकापर्यंत सगळ्यांना ट्रोल करत आहेत. निर्मात्यांनी मालिकेची कथा खराब केली, त्यामुळे मालिका कोणीही पाहणार नाही, असेही ते म्हणाले.

सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर, शोची लेखिका नुरन मखदूम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या विषयावर लेखिका नक्कीच काही खुलासा करतील असे प्रेक्षकांना वाटले, पण तिच्या त्या विधानाने वादाला नवा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नूरन मखदूम म्हणाल्या की, ”पडद्यावर हे पहिल्यांदाच घडत नाहीये. तसेच, जर प्रेक्षकांना ते समजत नसेल तर, मी ते बदलू शकत नाही. हे फक्त नाटक आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्यापेक्षा प्रेक्षकांनी संपूर्ण कथा उलगडण्याची वाट पहावी.”

तेरे बिन मालिकेचा ४६व्या भागाच्या शेवटच्या सीनमध्ये मुर्तसिम खान (वाहज अली) त्याच्या पत्नी मीराब (युमना जैदी) सोबत काहीतरी चुकीचे करणाार असल्याचे दाखवण्यात आले होते. तो बेडरुमचा दरवाजा बंद करतो आणि एपिसोड तिथेच संपतो. त्यानंतर आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये मीरब उदास अवस्थेत बेडजवळ बसलेली आहे.

मुर्तसिमला प्रचंड राग आलेला आहे. तो रागाने काच फोडतो असे दाखवण्यात आले आहे. बायकोशी काही चुकीची वर्तणूक केल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. ‘तेरे बिन’ मालिका तुम्ही जिओ टिव्हीवर पाहू शकता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

हे देखील वाचा