Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड करण जोहर अडचणीत! कायदेशीर कारवाई करणार ‘हा’ प्रसिद्ध गायक

करण जोहर अडचणीत! कायदेशीर कारवाई करणार ‘हा’ प्रसिद्ध गायक

करण जोहर (Karan Johar) आणि टी-सिरीजच्या बॅनरखाली तयार होत असलेला, ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. ट्रेलर रिलीझ झाल्यानंतर पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकने चित्रपटातील ‘नच पंजाबन’ गाणे चोरल्याचा आरोप केला होता. त्याच्या मूळ गाण्याचे हक्क त्याने कोणालाही विकले नसून, त्याच्या परवानगीशिवाय हे गाणे चित्रपटात वापरण्यात आल्याचा आरोप गायकाने केला आहे. त्याचवेळी, आता पुन्हा एकदा पाकिस्तानी गायकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून, करण जोहरवर कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “अनेक चाहते मला विचारत आहेत की, माझे ‘नच पंजाबन’ गाणे चोरीला गेले असताना मी करण जोहर किंवा टी-सीरिजच्या विरोधात कोर्टात का गेलो नाही? होय, मी कोर्टात जात आहे, काळजी करू नका. फक्त म्हणायचे श्रेय दिले, तुम्ही गाणे खूप छान लिहिले आहे, आमचा चित्रपट हिट होईल, हे योग्य नाही. मी त्यांना कधीच माझे गाणे दिले नाही आणि माझे गाण्याचे हक्क विकले नाहीत. हे माझे गाणे आहे आणि मी ते परत घेईन. मी कोर्टात जात आहे.” हा व्हिडिओ शेअर करत अबरारने लिहिले की, “आमची गाणी चोरणे थांबवा.” यासोबतच त्याने करण जोहर, टी-सिरीज आणि धर्मा चित्रपटालाही टॅग केले आहे. (pakistani singer abrar ul haq will take legal action against karan johar)

याआधी जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला तेव्हा पाकिस्तानी गायकाने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले होते की, “मी माझे ‘नच पंजाबन’ हे गाणे कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकले नाही आणि मी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जात आहे. करण जोहरने चोरून गाणी वापरू नयेत. हे माझे सहावे गाणे आहे, जे चोरीला जात आहे.”

या प्रकरणी टी-सिरीजकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते की, “‘जग जुग जियो’ गाण्याचे हक्क कायदेशीररित्या विकत घेतले आहेत, जेणेकरून ‘नच पंजाबन’ गाण्याचे रुपांतर करता येईल.” हा अल्बम १ जानेवारी २०२२ रोजी आईट्यून्सवर रिलीझ झाला होता. हे गाणे लॉलिवुड क्लासिक यूट्यूब चॅनेलवर देखील आहे, जे मूव्ही बॉक्स रेकॉर्ड लेबलच्या मालकीचे आहे.

तसेच ‘जुग जुग जियो’ २४ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर आणि मनीष पॉल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा