पलक तिवारी (palak tiwari) अनेकदा तिच्या सौंदर्य आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री ना आतापर्यंत छोट्या पडद्यावर दिसली आहे ना तिने चित्रपटात पदार्पण केले आहे. असे असूनही पलकचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण यावेळी पलकचं रूप बघून चाहते तर सोडाच तिची आई श्वेता तिवारीही (shweta tiwari) पाहून थक्क झाली. पलक तिवारीने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि लोक तिची प्रशंसा करताना थकत नाही आहेत.
पलक तिवारीने शेअर केलेला व्हिडिओमध्ये ती अतिशय सुंदर साउथ इंडियन गुलाबी साडीत दिसत आहे. ज्यावर तिने डोक्यापासून पायापर्यंत दागिनेही घातले आहेत. गळ्यात हार, कानात झुमके, कमरबंद, केसात गजरा अशी ब्युटी क्वीन बघून चाहते वेडे झाले आहे. पलकचा हा एक प्रमोशनल व्हिडिओ आहे, परंतु मुलीचा असा लूक पाहून आई श्वेता तिवारीचाही यावर विश्वास बसत नाही.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहून श्वेताने लिहिले – अरे देवा, माझ बाळ. त्याचबरोबर केवळ श्वेताच नाही तर पलकचे चाहतेही तिच्यावर भरभरून लाईक आणि कमेंटचा वर्षाव करीत आहे. कोणी तिला सुंदर तर कोणी तिला देवी म्हणून संबोधत आहे. एका चाहत्यांने स्थूती करत लिहीले, तु किती सुंदर दिसत आहे.
हार्डी संधूसोबत बिजली-बिजली या गाण्याने चर्चेत आलेली पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा भाग बनणार असल्याचे बोलले जात आहे. आता या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच कळेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ट्रेलर नंतर गुडबाय चित्रपटातील पहिले गाणे या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’
उतावळ्या चाहत्याचा ऋतिक रोशनसोबत बळजबरीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न, संतापलेल्या अभिनेत्याने चांगलंच झापलं