Monday, July 1, 2024

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल

बॉलिवूड सध्या लग्नाचा सिझन सुरु असल्याचं दिसत आहे. अनेक मोठमोठ्या कलाकाऱ्यांनी यंदा लग्न केले. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ते रिचा आणि अली फजल, राजकुमार राव यांची नावे आहेत. तर कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या असतांना बॉलिवूड गायिका पलक मुच्छाल(Palak Muchhal) ही देखील आता लग्नबंधनात अडकणार आहे.

यादरम्यान, प्रसिद्ध गायिका पलक मुच्छालच्या प्रीवेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. नुकताच तिचे हळदीचे कार्यक्रम झाले असून ती आता पियाच्या नावाची मेहंदीही पलकच्या हातावर लागणार आहे. हळदीनंतर आता तिला मेहंदीही लागणार आहे. गायिकेच्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. फोटो आणि व्हिडिओमध्ये पलकच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

 

पलक मुच्छालच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मिडियावरच्या पेजवर शेअर केल्या आहेत. या खास प्रसंगी पलकने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, ज्यावर सिल्व्हर कलरमध्ये सुंदर नक्षीकाम केले होते. तिच्या गळ्यात हार आणि कपाळावर मांग टिका असलेली पलक मुच्छाल तिच्या मेहंदी सोहळ्यात अतिशय सुंदर दिसते.

पलकने संगीतकार मिथुन शर्माला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. दोघे 6 नोव्हेंबर 2022 रोजी लग्न बांधणात आहेत. त्यांच्या लग्नाची थीम राजस्थानी ठेवण्यात आली आहे. पलक मुच्छाल ही मूळची इंदूरची असली तरी तिचे लग्न मुंबईत होणार आहे. ज्यामध्ये जवळच्या नातेवाईकांपासून ते इंडस्ट्रीतील मित्रही सहभागी होणार आहेत.

पलकने चॅरिटीसाठी गाण्यांनी सुरुवात केली आणि त्याचे खाजगी अल्बम रिलीज केले. त्याच बरोबर तिने आशिकी २, आर… राजकुमार, जय हो, किक, गब्बर इज बॅक, बाहुबली: द बिगिनिंग, प्रेम रतन धन पायो, एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरीसाठी यांसारखी हिट गाणी गायली आहेत. तर मिथुनने 2005 मध्ये जहर चित्रपटातील वो लम्हे या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांने अनवर, मर्डर 2, जिस्म 2, आशिकी 2, एक व्हिलन ते हाफ गर्लफ्रेंड, कबीर सिंग, राधे श्याम आणि शमशेरा यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! वरुणने ढसाढसा रडत व्यक्त केलं दु: ख; अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना

मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामावर सलमान खान झाला खूश; म्हणाला, ‘बाल तस्करी हा…’

हे देखील वाचा