‘बिजली गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री पलक तिवारी आज सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर तर ती मोठ्ये प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेग वेगळे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या कातिल अदांनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांना वेड लावत असते. फॅशनच्या बाबत ती तिची आई श्वेता तिवारीला टक्कर देताना दिसते. अशातच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिचा हॉट लूक फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने पीच कलरच्या शॉर्ट ड्रेससोबत व्हाईट कलरचा ओपन कोट घातला आहे.
पालक तिवारी तिच्या सौंदर्याने लाखोंना घायाळ करत असते. अशातच तिने आता शेअर केलेले फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिने पीच कलरच्या शॉर्ट बॉडीफिट सोबत ब्लेझर घातले आहे. यात ती बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “ए विंटर रोज.” तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगाती बिजलानीने देखील कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे की, “खूप सुंदर.” तिच्या या फोटोवर अनेक चाहते हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केली आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (palak tiwari’s hot photos viral on social media)
तिच्या या फोटोतील एक खास गोष्ट म्हणजे तिने घातलेली इअरिंग. तिच्या या इअरिंगची किंमत १९०० एवढी आहे. तसेच तिने न्यूड मेकअप केला आहे. मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. पलकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील अनेक दिवसापासून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशी चर्चा चालली आहे. तिला बॉलिवूडमध्ये बघण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- करिअरच्या सुरुवातीला लतिकाने केलाय ‘या’ गोष्टींचा सामना, आईने दिला होता आत्मविश्वास
- Bharti Singh | ‘हुनरबाज’च्या सेटवर पार पडलं भारती सिंगचं ‘बेबी शॉवर’, व्हिडिओ आला समोर
- कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी