Sunday, June 8, 2025
Home वेबसिरीज सचिवला सोडून ‘या’ व्यक्तीच्या गळ्यात पडली ‘पंचायत’मधील रिंकी, नेटकरी म्हणाले, ‘देख रहा है न बिनोद’

सचिवला सोडून ‘या’ व्यक्तीच्या गळ्यात पडली ‘पंचायत’मधील रिंकी, नेटकरी म्हणाले, ‘देख रहा है न बिनोद’

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही वेबसीरिज या प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘पंचायत’ होय. पंचायत या वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वानेही ओटीटीवर धमाल केली आहे. यातील प्रत्येक कलाकार खूपच प्रसिद्ध झाला आहे. मात्र, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घटना घडो, पंचायत वेबसीरिजमधील ‘बनराकस’ म्हणतो की, ‘देख रहा है न बिनोद.’ सोशल मीडियावर ‘बनराकस’ आणि ‘बिनोद’ यांचे मीम्स जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे प्रधान जी आणि सचिव जी यांच्या काळजाचाही ठोका चुकू शकतो.

खरं तर, फुलेराची गोंडस ‘रिंकी’ सचिव जी यांना सोडून दुसऱ्याच कुणासोबत दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या बिनोद ही भूमिका साकारणारा अशोक पाठक आणि प्रधान जी यांची मुलगी रिंकी म्हणजेच सानविका (Sanvikaa) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत रिंकी प्रेमाने बिनोद (Binod) याच्या गळ्यात हात टाकून उभी आहे. तसेच, अशोक त्याची सिग्नेचर स्माईल देताना दिसत आहे.

ही पोस्ट शेअर करत सानविकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “देवानंतर जर कोणाला सर्व काही दिसत असेल, तर तो बिनोदच आहे, विश्रांती घ्या… अशोक पाठक तुमचे डोळे दुखले असतील. आमचे स्वतःचे ह्युम सीसीटीव्ही.” यासोबतच तिने चाहत्यांसाठी लिहिले आहे की, “‘देख रहा है बिनोद’ लिहून तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanvikaa (@sanvikkaa)

चाहत्यांनीही ही पोस्ट जोरात व्हायरल केली. एका युजरने लिहिले, “पाहत आहे ना बिनोद, तुमच्या लोकप्रियतेचा कसा फायदा घेतला जात आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “हा तर सचिवसोबत विश्वासघात आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanvikaa (@sanvikkaa)

खरं तर, खुद्द पंकज त्रिपाठी हे बिनोद हे पात्र साकारणाऱ्या अशोक पाठकचे चाहते आहेत. नुकतेच, पंकज यांनी एका टीव्ही शोमध्ये अशोक पाठक आणि दुर्गेश कुमार यांना सर्वोत्तम अभिनेता सांगितले होते. अशोकनेही धन्यवाद देत ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी सुखदुःखात साथ देत निभावली मैत्री, आजही होते चर्चा
केतकीची भन्नाट कलाकृती! शाईफेकीमुळे खराब झालेल्या ब्लाऊजवर केले सुंदर नक्षीकाम, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
सीनच इतका इंटीमेट की, भावनेच्या भरात वाहवत गेला रणदीप हुड्डा; पुढं अभिनेत्रीसोबत जे घडलं, ते…

हे देखील वाचा