‘पंचायत‘ ही Amazon Prime Video ची अतिशय लोकप्रिय वेब सिरीज आहे. तीचे आतापर्यंत तीन सीझन प्रसारित झाले असून, प्रेक्षक आता या मालिकेच्या चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. आता याच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. खरं तर, चौथ्या सीझनवर काम सुरू झाल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
‘पंचायत’चे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी चौथ्या सीझनचे काम सुरू झाल्याची घोषणा केली आहे. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लोकप्रिय कॉमेडी-ड्रामा मालिका पंचायतचे आणखी किमान दोन सीझन येणार आहेत. चौथ्या सिझनचे कामही सुरू झाले आहे. चाहत्यांचा आनंद द्विगुणित करत ते म्हणाले की, पाचव्या सिझन साठीही नियोजन केले जात आहे.
मात्र, प्रेक्षकांना चौथ्या सीझनची थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. पंचायतचा चौथा सीझन २०२६ मध्ये रिलीज होऊ शकतो. मालिकेचा पहिला सीझन २०२० मध्ये, दुसरा २०२२ मध्ये आणि तिसरा सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. प्रत्येक सीझनमध्ये दोन वर्षांचे अंतर असते, त्यामुळे त्याचा चौथा सीझन २०२६ मध्ये रिलीज होऊ शकतो. तिसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडले, जसे की प्रधान जी वर कोणी हल्ला केला आणि अभिषेक शेवटी CAT परीक्षा पास होईल की नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या पुढच्या सिझनमध्ये मिळतील.
पंचायतच्या चौथ्या सीझनचा काही भाग यापूर्वीच लिहिले गेल्याचा खुलासा दिग्दर्शकाने केला आहे. ते म्हणाले, ” सीझन चारचे लेखन सुरू झाले आहे. आमच्यासाठी सीझनमध्ये सहसा कोणतेही बदल होत नाहीत. आम्ही शो चे तीन किंवा चार भाग लिहिले आहेत आणि तिसरा सीझन आधीच पूर्ण झाला आहे.” ते पुढे म्हणाले, “आम्ही आतापर्यंत चौथ्या आणि पाचव्या सीझनची निर्मिती करण्याचा विचार केला आहे. आमच्याकडे चौथ्या सीझनसाठी चांगल्या कल्पना आहेत आणि पाचव्या सिझनसाठी देखील बऱ्याच विस्तृत योजना आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
कठीण काळातून जातेय जॅकलिन फर्नांडिस; अशी सावरतेय स्वतःला…