Tuesday, July 23, 2024

Birth Anniversary : संगीतातील सात स्वरांप्रमाणे ‘या’ सात महिलांचे पंडित रवीशंकर यांच्या आयुष्यात होते महत्वाचे स्थान

भारतीय संगीत क्षेत्राला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी आपले योगदान दिले आहे. यामध्ये जर भारतीय शास्त्रीय संगिताचा इतिहास काढायचा म्हणले तर प्रसिद्ध सितार वादक पंडित रवीशंकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशीच त्यांची कारकिर्द राहिली आहे. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या सिताराची धून आजही प्रत्येकाच्या मनात रेंगाळत असते. गुरूवारी (७, एप्रिल) पंडित रवीशंकर यांची जयंती. १९२० मध्ये त्यांचा बनारसमध्ये जन्म झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षीपासून त्यांनी सितार वादनाला सुरूवात केली. आपल्या मधुर सुरांसाठी, संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या पंडित रविशंंकर यांच्या आयुष्यात ज्या प्रमाणे सात स्वर संगीतात महत्वाचे असतात त्याप्रमाणे सात महिलांना महत्वाचे स्थान होते. ज्यांचा पंडित रवीशंकर यांच्या यशात मोलाचा वाटा होता. कोण आहेत या महत्वाच्या महिला आणि काय होते त्यांचे स्थान चला जाणून घेऊ. 

हेमांगिनी देवी (आई)-  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. आईच्या संस्कारामुळेच कोणतीही व्यक्ती महान होत असते. याचप्रमाणे पंडित रवीशंकर यांच्याही आयुष्यात त्यांच्या आईने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे वडिल श्याम शंकर यांनी लंडनमध्ये वकिली करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तिकडेच त्यांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे रवी शंकर यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला होता.

अन्नपूर्णा देवी- पंडित रवीशंकर यांनी सितार शिकण्यासाठी घर सोडले होते. आणि ते सिताराचे शिक्षण घेण्यासाठी अल्लाउद्दीन खां यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गुरूंची मुलगी अन्नपूर्णा हिच्याशी मैत्री झाली. आणि त्यांच्या आयुष्यातील या दुसऱ्या स्वराचे आगमन झाले. अन्नपूर्णादेवीशी त्यांनी १९४१ मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगाही झाला. लग्नाच्या २० वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

कमला देवी (पहिली प्रेयसी) –  आपल्या पत्नीपासून लांब गेल्यानंतर रवीशंकर यांच्या आयुष्यात कमला देवी नावाची प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आली. कमला देवी आणि रवी शंकर अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. मात्र त्यांचे हे नाते कायमचे टिकू शकले नाही. आणि त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सू जोन्स – कमला देवीसोबतच्या दुराव्यानंतर पंडित रवीशंकर यांच्या आयुष्यात सू जोन्स नावाची परदेशी महिला आली. सू जॉन्स या न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध कॉन्सर्ट निर्मात्या होत्या. पंडित रवी शंकर आणि सू जोन्स अनेक वर्ष लिव्हइनमध्ये होते. त्यांना एक मुलगीही झाली. नोराहसुद्धा सध्या प्रसिद्ध गायक आणि सितार वादक आहे.

सुकन्या राजन – स्यू जोन्ससोबत वेगळे झाल्यानंतर, 1981 मध्ये रविशंकर सुकन्या राजनच्या संपर्कात आले, जी त्यांच्या आयुष्यातील पाचवी सरगम ​​बनली. यादरम्यान, एकत्र राहत असताना सुकन्याने मुलगी अनुष्काला जन्म दिला. एका मुलीच्या जन्मानंतर या जोडप्याने 1989 मध्ये लग्न केले.

अनुष्का शंकर -निराह जोन्स –
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्यांच्या मुलींचे स्थान अढळ असते. अनुष्का आणि निराह पंडित रवीशंकर यांचा संगीताचा समृद्ध वारसा या दोघी सध्या पुढे चालवत आहेत. या मुलींमुळेच त्यांच्या आयुष्यातील सात स्वर पूर्ण झाले आहेत. नोराह आज अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा