टीव्ही मालिका ‘पांड्या स्टोअर’मधील एका अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आहे. अभिनेत्रीचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यानंतर आता तिच्या आजारी पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अभिनेत्रीने स्वतः सांगितले की, लग्नाच्या काही दिवसांनंतर तिची तब्येत अचानक इतकी बिघडली, की तिला घाईघाईत रुग्णालयात दाखल करावे लागले. डेली सोप ‘पंड्या स्टोअर’मध्ये अनिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सृष्टी माहेश्वरी (Shrashti Maheshwari) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला.
सृष्टी सध्या ‘पांड्या स्टोअर’ या मालिकेतून गायब आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही. माझ्या पोटात दुखू लागले आणि ते आणखी वाढू लागले, त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. मला अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी खूप वेदना होत होत्या की हलताही येत नव्हते.” (pandya store actress hospitalized after wedding)
सृष्टीने पुढे सांगितले की, “सध्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.” सृष्टीचा पती करण याने तिची रुग्णालयात भरतीदरम्यान काळजी घेतली. सृष्टीने सांगितले की, “तो (करण) खूप सपोर्टिव्ह आहे. या कठीण प्रसंगात तो सदैव माझ्यासोबत होता. आणि माझी खूप काळजी घेतली.”
सृष्टी माहेश्वरीने गेल्या महिन्यात १९ जून रोजी करणशी लग्न केले. सृष्टीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये मेहंदी आणि हळदीपासून लग्नापर्यंतचे सर्व फोटो समाविष्ट आहेत. या लग्नात दोन्ही कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच सहभागी झाली होती. सृष्टीचा नवरा करण बेंगळुरूस्थित टेक इंजिनिअर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा