मनोरंजनविश्वात सगळीकडे सध्या आनंदी आनंद आहे. कुठे कलाकार लग्नबेडीत अडकत आहे, तर काही कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन होताना दिसत आहे. अशातच टेलिव्हिजन विषयातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता असलेला अक्षय खरोडिया नुकताच बाबा झाला आहे. अक्षयची सहकलाकार असलेल्या शाइनी दोशीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना आई बाबा झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. अक्षय आणि त्याची पत्नी असलेल्या दिव्या पुनेथाने एका मुलीला जन्म दिला आहे.
दिव्या पुनेथाने डॉक्टर असून, अक्षय आणि दिव्याला आईबाबा झाल्यामुळे सर्वच स्तरातून शुभेच्छा मिळत आहे. अक्षय खरोडिया सध्या स्टार प्लसवरील ‘पंड्या स्टोर’मध्ये मुख्य भूमिका निभावताना दिसत आहे. एका मुलाखतीदरम्यान अक्षयने सांगितले की, जवळपास ७/८ वर्षांपूर्वी दिव्यासोबत तो बँकॉकला गेला होता तेव्हा त्याला तिथे लहान मुलाचा देस घ्यायचा होता. यासाठी त्याने हट्ट देखील केला होता.
अक्षय तेव्हा दिव्याला डेट करत होता. त्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी पॅरेंटिंगवर अनेक व्हिडिओ बघत असून, माझ्या बाळाच्या आगमनाआधी मी याबद्दलचे ट्रेनिंग देखील गेट आहे. ही भावना खूपच आनंद देणारी आणि सुखदायक आहे. मी माझ्या लग्नाच्या आधीच माझ्या लहान मुलांसाठी कपडे खरेदी केले होते. मला नेहमीच हे माहित होते की, मी दिव्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत करू इच्छित होतो.”
पुढे अक्षय म्हणाला की, “आम्ही दोघं जवळपास ७/८ वर्षांपूर्वी जेव्हा बँकॉकला गेलो होतो तेव्हा मी लहान मुलांचा ड्रेस घेण्यासाठी अक्षरशः जमिनीवर बसलो होतो. कारण मला तो ड्रेस घ्यायचा होता. तेव्हा दिव्याला खूपच लाज वाटत होती. तेव्हा आमचे लग्न देखील झाले नव्हते आणि मी ड्रेस घेणयासाठी हट्ट करत होतो.”
पुढे तो म्हणाला की, “मी माझ्या पत्नीला धन्यवाद म्हणू इच्छितो की. तिने मी नसतानाही सर्व गोष्टी सांभाळल्या. मी दिवसाचे १२ तास सेटवर घालवतो, त्यामुळे मी जेव्हा रात्री घरी जायचो तेव्हा यूटुबवर व्हिडिओ पाहून स्वतःला ट्रेनिंग देत होतो. माझी पत्नी स्त्रीरोग असल्याने ती मला अजिबात कोणतेही टेन्शन देत नव्हती.” अक्षयची भूमिका असलेली ‘पंड्या स्टोर ‘ ही मालिका सध्या सर्वत्र चांगलीच गाजत असून टीआरपीमध्ये टॉपवर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-