Sunday, October 6, 2024
Home भोजपूरी हे भारीये! पंजाबी तितलीया गाण्याचे भोजपुरी वर्जन तुफान व्हायरल, बोल ऐकून तुम्हालाही येईल हसू

हे भारीये! पंजाबी तितलीया गाण्याचे भोजपुरी वर्जन तुफान व्हायरल, बोल ऐकून तुम्हालाही येईल हसू

बदलत्या काळानुसार भोजपुरी गाण्यांनी देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांची जागा बनवली आहे. बॉलिवूड प्रमाणेच आजकाल भोजपुरी गाणी देखील क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. भोजपुरी गाणी व्हायरल होताच त्यांना यूट्यूबवर लाखोंमध्ये व्ह्यूज येतात. अश्यातच हार्डी संधू आणि सरगुन मेहता यांच्या पंजाबी तितलीया या गाण्याचे भोजपुरी वर्जन प्रदर्शित झाले आहे. ते सध्या यूट्यूबवर धमाल करताना दिसत आहे.

पंजाबीमधील या गाण्याने तर संगीत प्रेमींना अक्षरशः वेड लावले होते. तेच वर्जन भोजपुरीमध्ये ऐकताना आणि बघताना भोजपुरी प्रेक्षकांना खूपच आनंद होत आहे. भोजपुरीमध्ये हे गाणे गुंजन सिंग आणि अंतरा सिंग प्रियांका यांनी गायले आहे. या गाण्याला यूट्यूबवर करोडोमध्ये व्ह्यूज मिळत आहे. भोजपुरीमध्ये अखिलेश कश्यप यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे, तर श्याम सुंदर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. आदीशक्ती फिल्म्स यांनी या गाण्याला त्यांच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे.

या गाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, भावाच्या लग्नात त्याच्या मेव्हणी बद्दल सांगताना हे गाणे बनवले आहे. या गाण्याचा हिरो त्याच्या वहिनीला तिच्या बहिणीची तक्रार करत आहे. अश्या प्रकारे एक आंबट गोड संवाद या गाण्यातून दाखवला आहे. त्यांचे हे गाणे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. याआधी देखील गुंजन सिंग आणि अंतरा सिंग प्रियंका यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. ज्यांना दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामध्ये ‘भौजी हरदी लगावो हैं ना’, ‘बराती गारी’, ‘दुल्हवा लागे भैसचरवा’ हि गाणी हिट झाली आहेत.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा