Saturday, June 29, 2024

अग्निपथ योजनेच्या विरोधावर आलं पंकज त्रिपाठींचं वक्तव्य; म्हणाले, ‘विरोध करणे योग्य आहे, पण…’

अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी मंगळवारी सांगितले की, लोकशाहीमध्ये लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, पण तो शांततेने केले जावा. एका पत्रकार परिषदेदरम्यान, ४५ वर्षीय अभिनेत्याला केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या नवीन लष्करी भरती योजनेच्या विरोधात देशव्यापी निदर्शनांवर भाष्य करण्यास सांगितले. ते म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकार आहे. पण, आंदोलन शांततेत आणि योग्य पद्धतीने व्हायला हवे, असे माझे मत आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोणत्याही आंदोलनात सरकारच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याचा अर्थ देशाच्या मालमत्तेचे नुकसान. या देशातील प्रत्येकाला आपले मत बोलण्याचा आणि शांततेने विरोध करण्याचा अधिकार आहे.” (pankaj tripathi reaction on agnipath demonstrations)

१४ जून रोजी जाहीर झालेल्या अग्निपथ योजनेत, १७ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी भरती करण्याची तरतूद आहे. त्यापैकी २५ टक्के तरुणांना १५ वर्षांसाठी कायम केले जाईल ठेवायची आहे. आणि बाकीच्यांना घरी पाठवले जाईल. या योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत, त्यानंतर केंद्राने या वर्षी भरतीसाठी वयोमर्यादा २३ वर्षे केली आहे.

‘शेरदिल: द पिलीभीत सागा’मध्ये दिसणार अभिनेता
पंकज त्रिपाठी चित्रपट निर्माते सृजित मुखर्जी यांच्या ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’ मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता एका गरीब शेतकरी कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेत आहे, ज्यामध्ये तो अडचणीतून जात आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे घडलेल्या सत्य घटनांवरून प्रेरित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा