Sunday, March 16, 2025
Home बॉलीवूड परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

राघव आणि परिणीती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सतत मीडियामध्ये येत आहेत. एका लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. आता तर हे दोघं लवकरच अर्थात याच महिन्यात साखरपुडा करत असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र परिणीती आणि राघव यांच्याकडून अद्याप त्यांच्या नात्याविषयी आणि मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दोघांना आतापर्यंत अनेकवेळा एकत्र स्पॉट केले गेले आहे.

अशातच आता नुकतेच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. तेव्हा त्यांना मीडियाने मोठा घेराव घातला. त्यांना कॅमेऱ्यांमध्ये टिपण्यासाठी एकच गोंधळ झाला. यातच परिणितीच्या बोटात अंगठी या फोटोंमध्ये कैद झाली. आता या दोघांनी गुपचूप त्यांचा साखरपुडा उरकला असल्याचे सांगितले जात आहे. परिणीती आणि राघव हे मुंबईमध्ये एका डेटला गेले होते. त्यांची डेट झाल्यानंतर जेव्हा ते रेस्टोरंटमधून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांना मीडियाने घेरले. यातच तिने तिच्या हातात टिंग फिंगरमध्ये एक डायमंड रिंग घातल्याचे लक्षात आल्यावर परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा आता होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लपून साखरपुडा उरकल्याच्या मीडियामध्ये होणाऱ्या चर्चांबाबत अजून या दोघांकडून काहींची माहिती आलेली नाही. दरम्यान या वेळी हे दोघं खूपच आकर्षक दिसत होते. परीने ब्लॅक ड्रेस विथ जॅकेट त्यावर व्हाइट स्नीकर्स, गुच्ची स्लिंग बॅग घेतली होती तर राघवन ग्रे शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती.

याआधी परिणीती आणि राघव या दोघांना मोहालीमध्ये आयपीएल मॅच बघताना स्पॉट केले गेले होते. त्यांनी जरी त्यांच्या नात्यावर भाष्य केले नसले तरी गायक आणि अभिनेता हार्डी संधू आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदवार्ता! धर्मेंद्रचा नातू ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात, प्रेयसी द्रीशासोबत घेणार सात फेरे

रविवारी जलसाचे गेट चाहत्यांसाठी बंद, बिग बींनी चाहत्यांना दिला माेठा इशारा, जाणून घ्या कार

हे देखील वाचा