Monday, July 1, 2024

परिणीती आणि राघव चड्ढा यांनी घेतला आयपीएल सामन्याचा आनंद; स्टेडियममध्ये घुमला ‘परिणीती भाभी’चा नाद, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही, परंतु वृत्तानुसार, दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहेत. या दोघांना अनेकदा मीडियाने एकत्र स्पॉट केले, आणि त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. मध्ये त्यांच्याबद्दल बातम्या येणे अचानक बंद झाले आणि त्यांना कुठेही मीडियाने स्पॉट केले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्या साखरपुड्याची तारीख मीडियामध्ये व्हायरल झाली आणि पुन्हा परिणीती राघव लाइमलाईट्मधे आले. आता यातच यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना नुकतेच मोहालीमध्ये आयपीएल सामना बघताना स्पॉट करण्यात आले आहे. मुंबई इंडियंस आणि पंजाब किंग्स यांच्यात नुकताच मोहालीमध्ये एक सामना झाला. या झालेल्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी परिणीती आणि राघव यांना स्टेडियममध्ये पाहण्यात आले. यावेळी या दोघांना पाहून स्टेडियममध्ये परिणितीला ‘भाभी’, ‘परिणीति भाभी’ असे आवाज देखील दिले गेले. याचा देखील व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

मोहालीमध्ये मॅच बघताना या कपलचे असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या फोटोंपेक्षा व्हायरल होणारे व्हिडिओ अधिक मजेदार आहेत. यात जेव्हा परिणितीला ‘भाभी’ आवाज दिला जात होता, तेव्हा ती डोक्यावर हात ठेऊन हसताना देखील दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABP UNCUT (@abpuncut)

दरम्यान हे दोघं येत्या १३ मे रोजी दिल्लीमध्ये साखरपुडा करणार आहे. दोघे गेल्या महिन्यात 10 एप्रिल रोजी साखरपुडा करणार असल्याची बातमी याआधी आली होती. मात्र नंतर ही तारीख बदलली गेली. हे दोघे मागील किती दिवसांपासून नात्यात आहेत, याबद्दल नीटशी माहिती उपलब्ध नाही. मात्र ते दोघेही जवळपास मागील सहा महिन्यांपासून एकत्र आहेत. राघव हे पंजाबमधील भगवंत मान सरकारचे मुख्य सल्लागार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा