Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड अभिनय सोडून परिणीती चोप्रा करतेय ‘हे’ काम; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

अभिनय सोडून परिणीती चोप्रा करतेय ‘हे’ काम; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या चित्रपट कारकिर्दीत तिने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. पण आता परिणीती चोप्रा अभिनय सोडून दिग्दर्शिक म्हणून काम करताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हि़डिओवरुन तुम्ही सहज अंदाज लावू शकता.

परिणीती अभिनेत्री नाही तर दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसली
परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट कोड नेम तिरंगा आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. को़ड नेम तिरंगा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परिणीती खूप अ‍ॅक्शन करताना दिसली आहे. परिणीतीची ही अ‍ॅक्शन स्टाईल चाहत्यांना फार आवडतं आहे. पण अभिनय क्षेत्र सोडून परिणीती चोप्राने आता दिग्दर्शन क्षेत्रात हात आजमावला आहे. पण त्यात थोडा ट्विस्ट आहे…

 

View this post on Instagram

 

यादरम्यान सोमवारी परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती कोड नेम तिरंगा चित्रपटांच्या सेटवर दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसत आहे. परिणीती चोप्राचा हा लूक आणि नवा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये परिणीती चोप्राने दिग्दर्शक बनण्याचा अनुभव शेअर केला आहे. परिणिती चोप्राने लिहिले आहे की, यामुळेच अभिनेत्री ठीक आहे. म्हणजेच परिणीती चोप्राला सांगायचे आहे की, दिग्दर्शक म्हणून काम करणे खूप आव्हानात्मक आहे. परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट कोड नेम तिरंगा 14 ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात परिणीती रॉ -एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

रिषभ पंतच्या नावाचं कुंकू भरुन उर्वशीने शेअर केले फोटो! चाहतेही म्हणाले, “गोष्ट लग्नापर्यत पोहोचली”
करण जोहरनं ट्विटरला केलं रामराम! चाहत्यांना बसला मोठा धक्का

हे देखील वाचा