Wednesday, July 3, 2024

ठरलं तर! परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा लवकरच होणार साखरपुडा, ‘या’ दिवशी दिल्लीमध्ये होणार समारंभ

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा हे त्यांच्या अफेयरच्या बातम्यांमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले आहे. या दोघांना अनेक एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राघव चड्ढा आणि परिणीतीच्या रिलेशनशिपबद्दल सध्या रोजच माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

परिणीती आणि राघव चड्ढा यांच्याकडून त्यांच्या नात्यावर कोणतेही अधिकृत माहिती आलेली नसली तरी या दोघांच्या नात्यावर आप खासदार संजय अरोरा यांनी शुभेच्छा देत शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधुने देखील परिणीती आणि राघवला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच आता परिणीती आणि राघव लवकरच त्यांच्या साखरपुडा करणार असल्याचे समजत आहे.

मीडियामधील प्राप्त माहितीनुसार परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार संपन्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत त्यांचा हा साखरपुडा होणार असून सध्या याची जोरदार तयारी दोघांच्याही घरी सुरू आहे. परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा अतिशय खासगी समारंभात होणार असून, त्याला जवळचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र नातेवाईक उपस्थितीत राहणार असल्याचे माहिती मिळत आहे.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या चर्चांमधेच तिची चुलत बहीण असलेली प्रियांका चोप्रा देखील पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. त्यामुळे हे देखील याच समारंभासाठी आले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान परिणितीच्या कामाबद्द सांगायचे झाल्यास ती राजश्री प्रॉडक्शनच्या ‘उंचाई’मध्ये झळकली होती. त्यानंतर आता ती लवकरच ‘चमकिला’ आणि ‘कैप्सूल गिल’ यामध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा

हे देखील वाचा