बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. ‘इशकजादे’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री परिणीती तिच्या मेहनतीच्या आणि कलेच्या जोरावर सध्या बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून गणली जाते.
सध्या परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट 26 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात परिणीती मिरा नावाच्या एका मुलीची भूमिका निभावताना दिसणार आहे, जिला एम्नेसिया नावाचा आजार असतो.
दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनकाळात तिला एक प्रश्न विचारला गेला होता. ज्यात, जर तिला तिच्या आयुष्यातील एखाद्या वाईट गोष्टीला विसरायचे असेल तर ती गोष्ट कोणती? असे विचारण्यात आले होेते.
यावर उत्तर देताना परिणीतीने, “जर मी माझ्या अशा आठवणींना विसरू शकले तर किती बर होईल, जेव्हा मी खूपच जाड होते. मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होते. आता मी स्वतःला तसं नाही पाहू शकत. पण जर मलाच माझ्या आयुष्यातील त्या आठवणी विसरता आल्या तर किती बर होईल. मी तेव्हाचे माझे फोटो पाहिले तरीही मला आता खूप भीती वाटते.” असे परिणीतीने यावेळी म्हटले.
https://www.instagram.com/tv/CLjjBNOF7Zk/?utm_source=ig_web_copy_link
याआधी परिणीतीला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटतील भूमिकेबाबत विचारले गेले तेव्हा तिने असे उत्तर दिले की,“मी एका व्यसनी भूमिका निभावली आहे. ही मी आजपर्यंत कधीच न केलेली भुमिका आहे. खरेतर माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी दारू पीत नाही. पण मी माझ्या प्रोफेशन आयुष्यात याचा खूप आनंद घेते. इथे मला ते सगळे रोल करायला मिळणार आहेत, जे मी याआधी कधीच नाही केले.”

परिणीतीच्या आगामी चित्रपटाची कहाणी एका घटस्फोटीत तरुण मुलीची आहे. जी लंडनमध्ये राहते. दररोज ट्रेनने ऑफिसला आणि तिच्या घरी प्रवास करते. एके दिवशी ती ट्रेनमध्ये असे काही बघते की, ज्यामुळे ती खूपच हैराण होते. बाकी यापुढील कथा प्रेक्षकांनी पडद्यावर पाहिल्यास अधिक मजा येणार आहे.