Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड पती सोबत बीचवर गेली परिणीती चोप्रा; खास लव्ह नोट सह दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

पती सोबत बीचवर गेली परिणीती चोप्रा; खास लव्ह नोट सह दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. काल, २४ सप्टेंबर २०२४ रोजी, या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. आज परिणीतीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच परिणीतीने राघव चढ्ढा यांच्यासाठी एक लव्ह नोटही लिहिली आहे. परिणीती चोप्राने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, ‘आम्ही काल एक शांत दिवस घालवला, जिथे फक्त आम्ही दोघेच होतो’.

परिणीती चोप्राने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, ‘आम्ही कालचा दिवस शांतपणे घालवला, जिथे फक्त आम्ही दोघेच होतो. तुम्ही सर्वांनी पाठवलेले अभिनंदन संदेश आम्ही वाचले, तुमच्या शुभेच्छांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत. रगाई- तुला मिळवण्यासाठी मी माझ्या मागच्या जन्मात आणि या जन्मात काय केले ते मला माहित नाही.

तीने पुढे लिहिले की, ‘मी एका सज्जन, चांगला मित्र, संवेदनशील जोडीदाराशी लग्न केले आहे. तू एक प्रामाणिक व्यक्ती आहेस, सर्वोत्तम मुलगा, जावई आहेस. तुमच्या देशाप्रती तुमचे समर्पण आणि कार्य मला खूप प्रेरणा देते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आपण आधी का नाही भेटलो? राघव लग्न वाढदिसाच्या खूप शुभेच्छा. आपण एक आहोत’.

परिणीती चोप्राने त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त पती राघवसोबत बीचवर शांत दिवस घालवला. परिणीतीने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे, त्यात ती तिच्या पतीसोबत समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. वाळूवर लिहिले आहे- ‘Happy Anniversary’.

दुसऱ्या फोटोमध्ये परिणीती चोप्रा राघवसोबत एक रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहे. दोघेही संध्याकाळी बीचवर एकत्र दिसतात. परिणीतीने फोटोसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती राघवसोबत बीचवर फिरताना दिसत आहे. दोघेही एकत्र क्वालिटी टाइम घालवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

बिग बॉस मध्ये परतणार सलमान खान; प्रोमो शेयर करत सांगितली प्रीमियारची तारीख…

 

हे देखील वाचा