Sunday, August 10, 2025
Home टेलिव्हिजन HBD : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला पार्थ समथानने केले आहे डेट, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

HBD : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला पार्थ समथानने केले आहे डेट, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

पार्थ समथान हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत अनुराग बसू हे पात्र निभावून घराघरात पोहचला आहे. लोकांना त्याचे पात्र देखील खूप आवडले. याव्यतिरिक्त ‘गुमराह’, ‘बेस्ट फ्रेंड फोरएवर’, ‘सावधान इंडिया: यांसाख्या अनेक शोमध्ये त्याने भाग घेतला आहे. शनिवार (11 मार्च) त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

पार्थ त्याच्या स्टायलिश लूकसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील जोरदार चर्चेत आहे. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री एरिका फर्नांडिससोबत देखील त्याचे नाव जोडले होते. यासोबतच त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे.

पार्थ समथान काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला डेट करत होता. हाती आलेल्या माहितीनुसार पार्थच्या आयुष्यात दिशाची जागा इतर कोणी घेतली आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी अशा देखील बातम्या येत होत्या की, पार्थ टीव्ही निर्माता विकास गुप्तला डेट करत होता. परंतु त्याने या बातमीला नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan)

विकास गुप्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना पार्थ समथान आणि त्याच्या रिलेशनबाबत सांगितले होते. परंतु पार्थ कधीही या मुद्यावर चर्चा केली नाही. एरिका फर्नांडिससोबत रिलेशन आणि ब्रेकअपबाबत देखील पार्थने कधीच वक्तव्य केले नाही. पार्थची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याला इंस्टाग्रामवर ३.३ मिलियन लोक फॉलो करतात. खास करून सगळ्यांना त्याची स्टाईल आणि लूक खूप आवडतो. त्याच्या चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.

नुकतेच त्याचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झालं आहे. पार्थ काही वेबसीरिजमध्ये देखील दिसला आहे. त्याने वेबसीरिज शो ‘कैसी ये यारिया ३’, ‘कहने को हम सफर है २’ मध्ये काम केले आहे. त्याच्याकडे बाकी देखील अनेक प्रोजेक्ट आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा