Monday, July 1, 2024

नेहा, टोनी आणि हनी सिंग धमाका करण्यासाठी सज्ज; घेऊन येतायत ‘हे’ गाणं

सध्या एकीकडे नवनवीन चित्रपटांच्या घोषणा सुरु असताना दुसरीकडे अनेक नवीन म्युझिक अल्बम्स देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम्स धुमाकूळ घालत असताना नवनवीन म्युझिक अल्बम्सच्या घोषणा देखील होत आहे. आजच्या घडीचे आघाडीचे गायक म्हणून ओळखले जाणारे नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंग हे तिघे लवकरच एका गाण्यासाठी एकत्र येत आहे.

आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंग हे ‘कांटा लगा’ या पार्टी अँथम गाण्याच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. देसी म्युझिक फॅक्टरी या गाण्याची निर्मिती करत आहे. या गाण्याचा एक छोटा टिझर हनी सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या टिझरमध्ये एक गूढ संगीत ऐकायला येत असून, सोबतच नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि हनी सिंगचे नाव आणि गाण्याचे टायटल स्क्रीनवर दिसत आहे. (desi factory announced new song)

या गाण्याची निर्मिती करत असलेल्या देसी म्युझिक फॅक्टरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याची घोषणा करत गाण्याबद्दल माहिती दिली आहे. आगामी काळात हे गाणे सुपरहिट होणार हे आतापासूनच पक्के समजले जात आहे. संगीत क्षेत्रातील आजच्या घडीचे हे सुपरहिट त्रिकुट एकत्र येणार म्हटल्यावर धमाका तर होणारच. या टिझरनंतर प्रेक्षक आणि फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

देसी म्युझिक फॅक्टरीचे अध्यक्ष असणाऱ्या अंशुल गर्ग यांनी सांगितले की, “आम्हाला ही घोषणा करताना अत्याधिक आनंद होत आहे, की आम्ही सर्वात लोकप्रिय आणि हिटमेकर्स असणाऱ्या तीन दिग्गजांना एकत्र अनंत आहोत. हा काळ आधीपेक्षा खूपच अनिश्चित आहे. आमची इच्छा आहे की, आमच्या गणायचे स्वागत प्रेक्षकांनी योग्य वेळेवर करावे.”

काही दिवसांपूर्वीच हनी सिंग त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला. त्याच्यावर त्याच्या बायकोने घरगुती हिंसेचा आरोप लावला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

हे देखील वाचा