Monday, July 15, 2024

जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट व्यावसायिकपेक्षा अधिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. मुलगी पूजा भट्टसोबत असलेले संबंध म्हणा किंवा मध्यंतरी गाजलेल्या रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या प्रेम संबंधाची चर्चा असो. त्याचप्रमाणे सतत विवादात असणारे महेश भट्ट आणि अभिनेत्री परवीन बाबी यांची रोमॅंटिक लाइफ एकेकाळी चर्चेचा विषय ठरली होती. असे म्हणतात की, परवीन बाबी महेश भट्ट यांच्या प्रेमात इतक्या बुडाल्या होत्या की, त्यांना समजवायला त्या नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या. दिवंगत अभिनेत्री परवीन आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीतला तो किस्सा..

एका चित्रपटावेळी महेश भट्ट (mahesh bhatt) आणि अभिनेत्री परवीन बाबीसोबत (parveen babi) काम करत होते, यावेळी परवीन बाबी विवाहित असलेल्या महेश भट्ट यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार,महेश परवीनसाठी आपली पत्नी आणि मुलीला सोडायलाही तयार झाले होते.  मात्र या दरम्यान परवीन यांना एका मानसिक आजाराने ग्रासले, ज्यामधुन त्या कधीच बाहेर येऊ शकल्या नाहीत.

‘या’ अटीमुळे संतापले होते महेश भट्ट
त्यांच्या नात्याबद्दल सांगताना महेश भट्ट म्हणतात की, परवीनसोबत राहताना त्यांच्या एका अटीमुळे ते रागारागात बेडरूममधून बाहेर पडले. त्यांनी सांगितले की, “त्या रात्री परवीन संबंध बनवू इच्छित होती. आम्ही जवळही आलो. त्याचवेळी ती ओल्या डोळ्यांनी म्हणाली की, ‘महेश एक तर मी, नाहीतर यूजी?’ तिचे हे बोलणे ऐकून मी चकित झालो होतो. मी काहीही उत्तर न देता तिथून बाहेर पडलो. त्यावेळी माझी समजुत घालण्यासाठी तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती कपडे न घालताच माझ्यामागे पळत आली. मात्र त्यानंतरही मी पर्वा न करता पुढे चालत राहिलो.” या घटनेच्या काही महिन्यानंतरच या दोघांचे ब्रेकअप झाले.

दरम्यान परवीन बाबी यांचा मृत्यू देखील असाच अनपेक्षितरीत्या झाला होता. असे म्हणले जाते की, त्यावेळी ३ दिवस रूममधे त्यांचा मृतदेह तसाच पडलेला होता. महत्त्वाचे म्हणजे,  त्यांच्या मृत्यूचे गूढ मात्र आजपर्यंत कायम आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा