Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड न्यायालयाकडून ‘पंगा क्वीन’ कंगनाला जोरदार झटका; पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला पासपोर्ट नूतनीकरणाचा निर्णय

न्यायालयाकडून ‘पंगा क्वीन’ कंगनाला जोरदार झटका; पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला पासपोर्ट नूतनीकरणाचा निर्णय

कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचमुळे पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्टचे नुतनीकरण करण्यास नकार दिला होता. म्हणून कंगनाने या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेत पासपोर्ट नुतनीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

या केसवर सुनावणी करताना कोर्टाने कंगनाला मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्यांचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणाच्या बाजूने दिला आहे. प्राप्त माहितीनुसार कंगनाची पासपोर्टचे नूतनीकरण करायचे की नाही, याचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणावर सोडण्यात आला आहे. त्यांनीच ठरवायचे की कंगनाचे पासपोर्ट रिन्यू करायचा की नाही. कोर्टाच्या निर्णयाची पूर्ण प्रत मिळाली की याबद्दलची अधिक माहिती समजेल. त्यातून हे देखील समजेल की, कोर्टाने नक्की कोणत्या मुद्द्याच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी कंगनाने काही दिवसांपूर्वी तिच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज करत सांगितले होते की, “कामानिमित्त मला देशाबाहेर प्रवास करावा लागतो. एका चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्या चित्रीकरणासाठी मला देशाबाहेर जावे लागते. मला जून ते ऑगस्ट दरम्यान हंगेरी व बुडापेस्टा या देशात चित्रीकरणासाठी जायचे आहे. माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात करण्यात येणार आहे. ते लोकेशन बुक करण्यासाठी निर्मात्यांनी पैसे खर्च केले आहेत. तिथे अभिनेत्री म्हणून उपस्थित राहणे गरजेचे आहे.”

कंगना आणि विवाद यांचे खूप जवळचे नाते आहे. आतापर्यंत कंगनावर अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद काही तिच्यासाठी नवीन नाही. कंगनाच्या ‘धाकड’ या सिनेमाचे शूटिंग परदेशात होणार आहे.

लवकरच कंगना तिच्या आगामी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. कंगनाने नुकतीच तिची एक पोस्ट इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे, ज्यात तिने मूवी माफियावर निशाणा साधला आहे. शिवाय तिने सर्वाना चेतावणी देत म्हटले आहे की, “जर लोकांनी मला त्रास देणे नाही थांबवले, तर मी सर्वांचे पितळ उघडे करेल. तेव्हा माझ्यावर १०० तक्रारी जरी दाखल केल्या तरी मला फरक पडत नाही.” असा धमकीवजा इशारा तिने मूवी माफियांना दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्ट लवकरच होणार कपूर घराण्याची सून?? नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर रंगल्या चर्चा

-‘बाळाचे प्लॅनिंग करेल तेव्हा सर्वात आधी मीडियाला सांगेल’; प्रेग्नेंसीबाबत अफवांवर ‘देसी क्वीन’ सपना चौधरीने दिली प्रतिक्रिया

-यामी गौतमने ‘या’ व्यक्तीला म्हटले तिच्या आयुष्यातील ‘वन मॅन आर्मी’; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा