बॉलिवूडचा रोमांटिक सुपरस्टार उर्फ किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान बुधवार (दि, 2 नोव्हेंबर) दिवशी 58वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी त्याने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्याने नुकतंच आपल्या आगामी येणारा चित्रपट ‘पठाण’ या आगामी येणाऱ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पठाण चित्रपटातील फस्ट लुकचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये शाहरुख एकदम हटके अंदाजात दिसत होता. त्याने फोटो शेअर करुन चाहत्यांची अत्सुकता वाढवली होती त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुकता लागली होती. शाहरुखने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करुन खुश केले आहे.
View this post on Instagram
पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) हे दिखिल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणर आहेत. प्रदर्शित झालेला टीझर 5 मिनिट 48 सेकंदाचा आहे. “क्या जानते हो तुम पठान के बारे में….?’ हा डायलॉग ऐकू येतो. ‘सुना है.. बोहोत टॉर्चर किया उसे.. पता भी नही, पठाण मराभी है या.. ‘जिंदा है.”, टीझरच्या सुरुवातीलाच अशा दमदार डायलॉगने सुरुवात केली आहे. टीझरमध्ये धमाकेदार थ्रिलर अॅक्शन आणि धमाकेदार डायलॉगने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
चाहते प्रदर्शित झालेल्या टीझरवर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. चाहत्यांना अनेक चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. आजचा दिवस किंग खानसाठी महत्वाचा आणि मोलाचा ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाद चांगलाच पेटला! शर्लिनने राखी सावंतला ‘टकली’ म्हणत वक्तव्याला दिले प्रतिउत्तर…
‘बिग बॉस’च्या घरात अजून एका नात्यामध्ये वादाची ठिणगी, तुटेल का मैत्री? जाणून घ्या एका क्लीकवर