बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण‘ चित्रपट रिलीज होण्यास फक्त एक दिवस उरला आहे. यादरम्यानही बॉलिवूडचा बादशाह त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. अलीकडेच, शाहरुखने त्याच्या ट्विटरवर चाहत्यांसह एक सेशन आयोजित केला. ज्याला त्याने ‘आस्क मी एनिथिंग’ असे नाव दिले. या सेशनमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. ज्याला शाहरुखने खूप प्रेमाने उत्तर दिले. मात्र, यादरम्यान एका ट्रोलरने त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला, ज्याला शाहरुखने चोख प्रत्युत्तर दिले.
शाहरुखने ट्विट केले की, पठाणवर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्यांनी हॉल बुक केले, नाचले, कटआउट्स लावले, प्रार्थना केली, कोणी मोठी समस्या बनू नये म्हणून मदत केली आणि एखाद्या सणाप्रमाणे तो साजरा केला. थिएटरमध्ये राहण्यात मला आनंद मिळताे, मला ते घरासारखे वाटते. ‘अ क्विक आस्क मी एनिथिंग’. शाहरुखच्या या ट्विटनंतर लगेचच त्याच्या चाहत्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका ट्रोलरने शाहरुखला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.
यादरम्यान एका ट्रोलरने शाहरुखच्या एका अवॉर्ड शोदरम्यान काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘फम्मे फटाले’. या फोटोमध्ये शाहरुख एका महिलेच्या अवतारात दिसत आहे. या ट्विटमध्ये ट्रोलरने हसणारे इमोजी देखील वापरले आहेत.
Arre no no this is me dressed as a lady. I know I am attractive in all avatars, but u will have to find yourself a better muse my friend!! Apologies for misleading you. https://t.co/XBK4PLFcBy
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 24, 2023
या ट्रोलरला शाहरुखने चोख प्रत्युत्तर दिले. त्याने लिहिले, ‘अरे नाही नाही… मीच स्त्रीचे कपडे घातले आहे. मला माहित आहे की, मी प्रत्येक अवतारात आकर्षक दिसतो, पण तुला स्वतःसाठी एक चांगले म्यूज शोधावे लागेल मित्रा!! तुमची दिशाभूल केल्याबद्दल क्षमस्व.
शाहरुख आणि सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पठाण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच INOX वर 2.75 लाख तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा आहे.(pathaan the troller tried to troll actor shahrukh khan by posting an old photo the actor gave a befitting reply)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत जाेडाे यात्रेत उर्मिलाचा सहभाग, राहुल गांधीचा हात हातात घेऊन चालली अभिनेत्री
हाय हाय फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिवशीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, क्रिएटिव्हिटीला मिळाली दाद