Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड बुर्ज खलिफावर झळकला ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क

बुर्ज खलिफावर झळकला ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाचा बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केले आहे त्यामुळे चित्रपट वादाच्या घेऱ्यात अडकला होता. आता मात्र, पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे. अशातच पठाणचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर झळकला आहे.

शाहरुख खान (Shaharukh Khan) मोस्ट अवेटेड पठाण (Pathan) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. अशातच हा ट्रेलर दुबईमधील सर्वाधिक उंच इमारत बुर्ज खलिफावर झळकला आहे. त्यावेळी शाहरुख खान देखिल पठाणच्या स्क्रीनिंगवेळी दुबईमध्ये उपस्थित असून त्याचा उत्साह सर्वाना थक्क करणारा होता. ट्रेलर बघत असताना अभिनेत्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत असून तो चित्रपटांच्या गाण्यावरही थिरकला आहे.

सर्वाधिक उंच इमारतीवर पठाण चित्रपटाचा ट्रेलर आणि शाहरुखला पाहाण्यासाठी लाखो संख्येने दुबईमधील चाहते जमा झाले होते. पठाण चित्रपटाचा ट्रेलर स्वत: शहारुखसोबत पाहाणे हे चाहत्यांसाठी विस्मरणीय क्षण होता. त्याशिवाय शाहरुखला बुर्ज खलिफावर पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद दुप्पट झाला होता.

पठाण चित्रपट (दि, 25 जानेवारी) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलमध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. यामध्ये शाहरुखचा तर थाटच वेगळा आहे. पठाण चित्रपटामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया देखिल महत्वाची भमिका साकारताना पाहायला मिळत आहे. बेशरम रंग गाण्यामुळे चित्रपट वादाच्या घेऱ्यात अडकाला होता मात्र, त्यामध्ये काही बदल केले आहेत त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अडचनी कमी झालेल्या दिसून येत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कांतारा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट
आदिल दुर्रानीने लग्नाला दिला नकार, राखी सावंतची कॅमेऱ्यासमोर रडारड

हे देखील वाचा