Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड पठाण सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगमुळेच सिनेमाने प्रदर्शनाआधीच केली कोटींची कमाई

पठाण सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगमुळेच सिनेमाने प्रदर्शनाआधीच केली कोटींची कमाई

सध्या सर्वच प्रेक्षकांचे एका सिनेमाकडे लक्ष लागले आहे. तो सिनेमा म्हणजे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘पठाण’. मागील बऱ्याच काळापासून या सिनेमाची भरपूर चर्चा होताना आपण पहिली आणि ऐकली देखील. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदीर्घ काळानंतर शाहरुख खानचा जळवा मोठ्या पडद्यावर लोकांना पाहायला मिळणार यामुळे फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. यह सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी तर ऍडव्हान्स बुकिंग देखील करायला सुरुवात केली आहे. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या सिनेमाची परदेशात ऍडव्हान्स बुकिंग कधीच चालू झाली आता भारतात देखील ऍडव्हान्स बुकिंग चालू झाली आहे. पठाण सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग २० जानेवारीपासून सुरु होणार होती, मात्र फॅन्समधील क्रेझ आणि उत्सुकता पाहून काही ऑनलाईन साईट्सने १९ जानेवारीपासूनच ऑनलाईन बुकिंग चालू केली. ही बुकिंग चालू झाल्यानंतर काही तासातच सिनेमाची सर्व तिकिटं विकली गेली. हे पाहून इतर सर्वच सिनेमागृहांनी त्याची ऑनलाईन बुकिंग चालू केली आहे.

pathan movie

एका माहितीनुसार हैद्राबादमध्ये केवळ २ तासातच १८ हजार तिकिटं विकल्या गेली आहेत. लोकांमध्ये पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिकाला एकत्र बघण्यासाठी आतुर झाले असून, ज्या पद्धतीने ही तिकिटं विकल्या जात आहे, ते पाहून सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच करोडोंची कमाई करेल. प्राप्त माहितीनुसार सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंगमधून तब्बल ४ कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. हे सर्व पाहून ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशी ३५ कोटींपेक्षा जास्तीचा व्यवसाय नक्कीच करेल असे समीक्षकांचे म्हणणे आहे. भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, यूएई आणि जर्मनीमध्ये पठाणला चांगली ऍडव्हान्स बुकिंग मिळाली आहे.

तत्पूर्वी ‘पठाण’ या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहाम आदी कलाकार मुख्य भूमिकेत असून, जॉन सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला वादाचे गालबोट लागले आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर चांगलेच वादात अडकले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा